विचारधारा

काही अशा गोष्टी ज्या तुमच्या आयुष्यात बदल घडवून आणतील

कोणत्याही गोष्टीची सुरुवात करत असताना अनेक गोष्टी आपल्यासाठी नवीन असतात आणि त्यामुळे खूप चुका देखिल आपल्या हातून घडतात पण त्याच चुका आपल्याला खूप मदत देखिल करतात. भविष्यात कोणती गोष्ट आवर्जून टाळायची हे कळते, आणि ती पुन्हा चुकून ही करायची नाही.

आणि या गोष्टी आपल्या विशीत देखिल होतात, खूप गोष्टींसाठी आपल्या मनात उत्सुकता असते, खूप गोष्टी जाणून घेण्याची इच्छा असते. आपल्या भविष्याचे सगळ्यात महत्वाचे निर्णय आपण आपल्या विशीत घेत असतो. त्यामुळे या वयात या गोष्टींकडे नक्की लक्ष द्या.

एखाद्या गोष्टीकडे पाहण्याची आपली मानसिकता कशी आहे हे खूप महत्वाचे असते. आपल्याला आयुष्यात पुढे जाण्यासाठी मदत करेल अशीच मानसिकता असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला कोणी सांगितलं की ही एखादी गोष्ट तुमची चुकत आहे तर, ते कोण बोलत आहे त्यापेक्षा जास्त, काय बोलत आहे याकडे जास्त लक्ष द्या आणि ते जे काही असेल ते सकारात्मकरित्या स्वीकारा.

असे खूप वेळा तुम्ही ऐकले असेल की ‘पैसाच सगळं नसतो’ तसं जरी असलं तरीही पैसा महत्वाचा देखिल असतो. तो आपल्याला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र बनवतो आणि त्या वयात पैसे कमावणं काय असतं हे माहीत पडलं की त्यामागची मेहनत कळते आणि मग त्या पैशांची किंमत देखिल.

मनाबरोबर शरीराची मजबुती ही तितकीच महत्वाची आहे. हळू हळू का होईना पण शारीरिकदृष्ट्या मजबूत होणे गरजेचे आहे. जसे आपण आर्थिकदृष्या स्वतंत्र होण्यासाठी प्रयत्न करू शकतो तसेच, शारीरिकदृष्ट्या करणे देखिल गरजेचे आहे.

विशीमधे असताना आपल्याला अनेक गोष्टींचे कुतूहल वाटत असते, कारण प्रत्येक गोष्टीची तेव्हा सुरुवात असते, प्रत्येक काम तेव्हा आपण नव्याने सुरू करत असतो. खूप अडथळे येतात मात्र आलेले अनुभव एकत्र करून आपण पुढे चालत राहतो.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *