बातमी

महाराष्ट्रात पोलिओ ड्रॉपऐवजी १२ मुलांना सॅनिटायजर देण्यात आले

महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईपासून सुमारे ७०० कि.मी. अंतरावर असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील एका गावात मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झाल्यामुळे १२ मुलांच्या तोंडी पोलिओ लसीऐवजी सॅनिटायजर देण्यात आले, अशी माहिती एका अधिकाऱ्याने सोमवारी दिली.

५ वर्षांच्या वयाच्या प्रभावित मुलांना सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, जेथे त्यांची स्थिती स्थिर असल्याचे सांगितले, जिल्हाधिकारी म्हणाले की, तीन आरोग्य कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई केली जाईल.

रविवारी एका गावात प्राथमिक आरोग्य केंद्रात ही घटना घडली जेव्हा १ ते ५ वर्ष वयोगटातील मुलांसाठी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली होती अशी माहिती अधिका-यांनी दिली.

यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ म्हणाले की, पाच वर्षापेक्षा कमी वयाच्या १२ मुलांना पोलिओ ड्रॉपऐवजी सॅनिटायजर देण्यात आले. त्यांची स्थिती आता स्थिर आहे आणि ते निरीक्षणाखाली आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, घटनेच्या वेळी तीन आरोग्यसेवा कर्मचारी – एक डॉक्टर, अंगणवाडी सेविका आणि एक स्वयंसेवक पीएचसी येथे उपस्थित होते. “चौकशी सुरू असून तिन्ही आरोग्य कर्मचार्‍यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात येतील,” असे श्री पांचाळ म्हणाले.

दरम्यान, दुसर्‍या अधिका-याने सांगितले की, ही घटना उघडकीस तेव्हा आली जेव्हा गावच्या सरपंचांनी पोलिओ डोस तपासले व त्यांना आढळले की ते पोलिओ डोस नव्हे तर सॅनिटायझर आहे.

या घटनेनंतर, क्षेत्रातील पालक भयभीत झाले आणि जबाबदार असलेल्या व्यक्तींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली. यवतमाळ जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी रुग्णालयात जाऊन मुलांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *