बातमी

सुहासिनी मुळे यांनी वयाच्या 60 व्या वर्षी का केले लग्न?

Suhasini mule marriage

सुहासिनी मुळे ही खर तर मराठी अभिनेत्री पण या अभिनेत्री ने जास्त करून हिंदी मालिकेमध्ये काम केलेले आपण पाहिले असेल पण या अभिनेत्रीने वयाच्या 60 वर्षी म्हणजे 2011 ला आपले लग्न पार पडले आहे हे कदाचित तुम्हाला माहीत नसेल. ती एक डॉक्युमेंट्री फिल्म निर्माता म्हणून ही कार्यरत आहे.

पहिले तर तिने जे लग्न केले त्याबद्दल ती कोणाला काहीही सांगण्यास उस्तुक नव्हती पण अचानक पणे तिने स्वतःहून हे सांगण्याचा निर्णय घेतला खर तर या वयात लग्न करणे तिलाही अपराधी सारखे वाटत असेल पण तसे मुळातच नाही याची जाणीव झाल्यावर तिने हे सांगितले.

तर हे लग्न कसे झालं असेल याची उस्तुकाता तुम्हाला सर्वानाच असेल तर प्रोफ़ेसर अतुल गुर्तु हे त्याचे जोडीदार यांच्यासोबत सुहासिनी मुळे याची फेसबुक या सोशल माध्यमाद्वारे मैत्री झाली. मैत्री करणे ही निसर्गाने दिलेली भेट आहे आणि याच मैत्रीतून त्यांच्यात प्रेम फुलले असेल आणि त्यानंतर त्यांनी दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला असेल. अतुल गुर्तु यांचे वय आहे 65 वर्ष आहे.

लग्न हे कोणत्याही वयात करायला हरकत नाही फक्त आपल्या जोडीदाराला समजून घेण्याची क्षमता एकमेकांमध्ये असायला हवी तरच हे लग्न शेवटाला जाते. कारण आपण असेही उदाहरणे पाहिली आहेत जिथे खूप कमी वयात लग्न होऊन, एकमेकांना समजण्यासाठी पुरेसा वेळ घेऊन सुद्धा लोकांचे घटस्फोट झाले आहेत.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *