मनोरंजन

प्रभासच्या आदीपुरुष सिनेमात हा मराठी अभिनेता साकारणार हनुमानजीची भूमिका

आदीपुरुष सिनेमाची जेव्हा पासून घोषणा झाली तेव्हा पासून हा सिनेमा चर्चेचा विषय ठरला आहे. रामायणावर आधारित ह्या सिनेमात श्री राम ह्यांची भूमिका प्रभास साकारणार आहे हे समजल्यावर ह्या चित्रपटाबद्दल उत्सुकता अजून शिगेला जाऊन पोहोचली.

तान्हाजी द अनसंग वारियर सिनेमाचे दिग्दर्शन ओम राऊत ह्यांच्या खांद्यावर आदीपुरुष सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी टाकण्यात आली आहे. एक मराठमोळा दिग्दर्शक एवढ्या मोठ्या सिनेमाचा भाग आहे हे ऐकून मराठी चाहते खूप जास्त आनंदित झाले आहेत.

प्रभास प्रभू श्री राम तर लक्ष्मणाची भूमिका अभिनेता सनी सिंघ तर माता सीतेच्या भूमिकेत अभिनेत्री क्रिती सेनन असणार आहे. तर रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान आपल्याला पाहायला मिळेल. एवढी भव्य दिव्य स्टार कास्ट असणारा रामायण वर आधारित हा सिनेमा पहायची इच्छा सर्वानाच लागून राहिली आहे.

आताच सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ह्या सिनेमात हनुमानाच्या भूमिकेत एका मराठमोळ्या कलाकाराला संधी देण्यात आली आहे. ही खूप म्हणजे खुप गर्वाची बाब आपल्यासाठी आहे. जय मल्हार मालिका फेम देवदत्त नागे हे हनुमानाच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तुम्हाला काय वाटते देवदत्त नागे भूमिकेत कसे उतरतील? तसे पाहायला गेले तर आपण जय मल्हार मालिकेत ह्याची प्रचिती पाहिलीच आहे.

हा सिनेमा २०२२ मध्ये प्रदर्शित होईल अशी माहिती ऑनलाइन पाहायला मिळते. ह्या सिनेमाची निर्मिती टी सिरिजचे भूषण कुमार करत आहेत.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *