सध्या सर्वात जास्त लोकप्रिय असणारी मालिका म्हणजे स्टार प्रवाह या वाहिनीवरील आई कुठे काय करते ही मालिका होय. अर्थातच महिलांना ही मालिका तितकीच आपल्या जवळची वाटते त्यामुळे सगळ्यांना या मालिकेची तितकीच ओढ लागलेली आहे. या मालिकेत एक गृहिणी आपल्या येणाऱ्या प्रत्येक संकटाना कशी सामोरे जाते ते पाहायला मिळते.
आपण जरी या अभिनेत्रीला अरुंधती देशमुख या नावाने जरी ओळखत असलो तरी तिचे खरे नाव मात्र मधुराणी गोखले प्रभूलकर आहे. तिचा जन्म भुसावळ या ठिकाणी झाला आहे. याशिवाय तिचे शिक्षण हे पुणे मध्ये झाले आहे. सगळ्याच अभिनेत्री प्रमाणे हिला ही लहानपणा पासूनच अभिनय करण्याची आवड होती आणि त्यातच तिने करिअर करण्याचे ठरविले.
त्यामुळे वयच्या 16 वर्षापासूनच तिने या क्षेत्रात उडी घेतली. याचबरोबर तिला संगीताची आवड आहे ती एक उत्तम गाईका आहे. तीच लग्न प्रमोद प्रभुळकर ह्यांच्या सोबत झाले आहे ते पेशाने लेखक तसेच डायरेक्टर आहेत. शिवाय दोघांच्या गोड संसात एक मुलगी ही आहे तीच नाव स्वराली आहे. या दोघांची मिळून अक्टिंग अकॅडमी आणि प्रोडक्शन हाउस ही आहे.
अरुंधती हिने सारेगमप या गाण्याच्या शो मध्ये ही सहभागी झाली होती. याच बरोबर अत्यंत गाजलेले नाटक म्हणजे तुमचं आमचं सेम असत यात ही मधुराणी होती. तसेच भूमिका हे नाटक, नवरा माझा नवसाचा या सुपरहिट सिनेमात ती आपल्याला पाहायला मिळाली आहे.
तसेच मनी मंगळसूत्र, भाभी पिडीया, युथ tube, गोड गुपित, गणप्या गावडे, सुंदर माझे घर याशिवाय अनेक मालिका म्हणजे इंद्रधनुष्य तसेच असंभव यात ही ती होती त्यानंतर कवितेचे पान या वेब सिरीज मध्ये ही ती दिसली. सह्याद्री वाहिनी वरील music ट्रॅक या कार्यक्रमाचं अंकरिंग ही या अभिनेत्री ने केले आहे.