मनोरंजन

आई कुठे काय करते मधील अरुंधतीला मिळतात प्रत्येक एपिसोडसाठी एवढे हजार रुपये

सध्या सर्व घरात मालिकांचे वेड असते. महिलावर्ग आपल्या आवडत्या मालिकेला सर्वात आधी पसंती देतात. सध्या सर्वात जास्त पाहिली जाणारी मालिका म्हणून आई कुठे काय करते कडे पाहिले जाते. अत्यंत कमी कालावधीत या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. यातले प्रत्येक पात्र जणू आपल्याच घरातील व्यक्ती आहेत असे लोकं समजू लागले आहेत. कदाचित हेच मालिकेचे सर्वात मोठे यश असावे.

आई कुठे काय करते मालिकेत काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराला या मालिकेने एक वेगळी ओळख दिली. एक स्टारडम काय असतो याचे उत्कृष्ट उदाहरण ही मालिका आहे. अभिनयाच्या या वळणावर असताना मानधनाचा आकडा अत्यंत महत्वाचा असतो. प्रत्येक कलाकाराला त्याच्या पर डे आणि भूमिकेनुसार मानधन मिळत असते. कधी कधी हा आकडा एवढा मोठा असतो मी चाहतावर्ग याचा विचार देखील करू शकत नाही.

Source Star Pravah Social Handle

आई कुठे काय करते मालिका टीआरपीच्या बाबतीत बऱ्याचदा अव्वल स्थानी असते. कारण या मालिकेचे कथानक नेहमीच प्रेक्षकांना खिळवून ठेवते. याचे सर्व श्रेय या मालिकेतील कलाकारांना जाते. जेवढी कलाकारांची लोकप्रियता असते तेवढे तगडे मानधन सुद्धा ते आकारतात. या मालिकेत अरुंधती म्हणजेच मधुराणी प्रभुलकरला प्रत्येक एपिसोड साठी २५ हजार एवढे मानधन घेते.

या मालिकेत तिची मुख्य भूमिका आहे. आणि घरातील प्रत्येक स्त्री कुठे ना कुठे अरुंधतीला स्वतःमध्ये पाहते. याच कारणाने मधुराणी प्रभुलकर म्हणजेच अरुंधती अत्यंत कमी वेळात तुफान लोकप्रियता मिळाली. या मालिकेतील इतर कलाकारांना सुद्धा योग्य ते मानधन मिळते. यात अनिरुद्ध म्हणजेच मिलिंद गवळी याला प्रत्येक एपिसोड साठी २० हजार तर संजना म्हणजेच रुपाली भोसलेला प्रत्येक एपिसोड साठी १७ हजार एवढे मानधन मिळते.

अरुंधती देशमुख हिच्या वयक्तिक आयुष्याबद्दल या गोष्टी तुम्हाला माहित नसतील. वाचा.

पण काही महिन्यांपासून मालिकेचा प्लॉट पूर्ण बदलून गेला आहे. त्यामुळे अनेकांनी या मालिकेकडे पाठ फिरवली आहे. पण निर्मात्यांना माहीत आहे प्रेक्षकांना काय हवं असते. त्यामुळे नक्कीच ये काहीतरी ट्विस्ट आणून पुन्हा आपला चाहतावर्ग स्वतःकडे खेचून घेतील.

तुम्हाला ही मालिका आवडते का? कोणता कलाकार जास्त आवडतो? बदललेले कथानक तुम्हाला कितपत योग्य वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा.

समंधित हे सुद्धा आर्टिकल वाचा.

Previous ArticleNext Article

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *