मनोरंजन

अनिरुद्ध संजनाशी लग्न करतो तुम्हाला पटते का?

“आई कुठे काय करते ही मालिका आता वेगळ्याच वळणावर येऊन ठेपली आहे. संजना आणि अनिरुद्ध यांचे एकमेकांवर खूप प्रेम हे जरी असले तरी अनिरुद्धला तिच्यासोबत लग्न करायचे नाही. हे कसले प्रेम याला फक्त शारीरिक आकर्षण म्हणतात हवं. त्याने कित्येकदा संजनाला सांगितले आहे की मला तुझ्याशी लग्न करायचे नाही तरीही संजना मुर्खासारखी त्याच्या पाठी लागली आहे.

जो माणूस आपल्याशी लग्न करायला तयार नाही त्याच्याशी लग्न करून हीचा संसार सुखाचा होईल का? हे समजू शकत नाही इतकी मूर्ख आहे का ती? पहिली गोष्ट म्हणजे अनिरुद्ध मूर्ख आहे, त्याला प्रेम करायच्या अगोदर कळायला हवे होते संजना फक्त त्याच्यावर प्रेम करू शकते त्याच्या घरच्यांवर अजिबात नाही. ती खूप पुढे गेलेली बाई आहे तिचा वेळ फक्त स्वतःच नट्टा पट्टा करण्यात आणि जॉब करण्यात जातो जीच घरात अजिबात लक्ष नसते. अशी मुलगी निवडली तिच्यासोबत दहा वर्ष नाते ठेवताना काहीच वाटले नाही.

जेव्हा घटस्फोट घेण्याची वेळ आली तेव्हा अनिरुद्धला हळू हळू समजले की अरुंधती त्याची बायको आहे तिने अनेक सुख दुःखात त्याला मदत केली आहे. त्याच एवढं मोठं कुटुंब तिने सांभाळलं आहे. कोणत्याही अडचणीत अरुंधतीने साथ दिली सर्व घर बांधून ठेवले. हे नक्कीच संजना करणार नाही हे अनिरुद्ध ला समजले आणि आता तो नेमका लग्न करण्याच्या वेळी पळून गेला.

पण पळून जाण्यात काय अर्थ आहे हे आहे त्याला सामोरे जायची धमक हवी ती त्याच्यात नाही. प्रेम करता येते पण ती निभवण्याची ताकत नसणे याच उदाहरण अनिरुद्ध देशमुख आहे. त्याला आता जरी कळले असले की त्याची बायको ही अरुंधती आहे तिच्याशिवाय त्याच्या बायकोची जागा कोणीच घेऊ शकत नाही.

पण तरीही आता बायकोची किंमत कळून आता काहीच उपयोग नाही  इतक्या वर्ष संसार करून तिला असा धक्का पचवणं कठीण आहे. त्यामुळे ती आता अनिरुद्धवर विश्वास ठेऊ शकत नाही हे खरे आहे. पण तरीही संजना घरी येऊन जो तमाशा घालते ते बघून कोणालाही राग येईल. पण तरीही तिथे अरुंधती येऊन तिला समजावते लगेच अनिरुद्धचा अरुंधतीला फोन येतो. ती त्याला बोलावून घेते. आणि अनिरुद्ध या लग्नासाठी तयार करते. दोघांचे लग्न होते.

खर तर यात कुठेतरी सगळच खोटं खोटं वाटते. अनिरुद्ध इतक्या कळवलिने सांगतोय मला संजनाशी लग्न करायचे नाही तरी त्याच्यावर जबरदस्ती करणारी अरुंधती की तुला संजनाशी लग्न करावेच लागेल. इथे खऱ्या आयुष्यात अशा अनिरुद्धने सांगितल्यावर आपली अरुंधती लगेच पाघळणार आणि त्यांचा संसार नव्याने सुरू होणार. शेवटी प्रत्येक स्त्रीला आपला संसार महत्त्वाचा असतो आपला नवरा हवा असतो.

पण अशा प्रकारे कोणतीही बायको करणार नाही तिला स्वतःचा संसार महत्वाचा असतो. पण शेवटी ही मालिका आहे आपल्या मनाप्रमाणे नाही चालणार. प्रेक्षकांना राग येईल अशीच दाखवणार.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *