मनोरंजन

“माझी तुझी रेशीमगाठ” या मालिकेतील सर्वांची आवडती परी येत आहे नवीन प्रोजेक्ट घेऊन

माझी तुझी रेशिमगाठ या मालिकेत अनेक कलाकार आहेत जे प्रेक्षकांना अगोदर पासूनच आवडतात. पहिले तर प्रार्थना बहिरे आणि श्रेयस तळपदे हे अष्टपैलू कलाकार असल्यामुळे मालिकेला भरभरून प्रेक्षक मिळाले आहेत पण खरा हिरा या मालिकेतील आहे तो म्हणजे परी (मायरा वायकुल) तिचा अभिनय पाहून सर्व प्रेक्षक भारावून गेले आहेत.

आता तरी मायरा ही माझी तुझी रेशिमगाठ या मालिकेच्या शुट्टींग दरम्यान व्यस्त आहे पण लवकरच ती तिच्या चाहत्यांसाठी एक नवीन प्रोजेक्ट घेऊन येत आहे. ती आपल्याला एक व्हिडिओ साँग मध्ये दिसणार आहे. या गाण्यात ती एक शाळकरी मुलगी म्हणून दिसणार आहे. गाण्याचा टीझर ही ८ मार्च या दिवशी प्रदर्शित करण्यात आला होता.

Source Koliwood Production

हे गाणं कोलिवूड प्रोडक्शनचे असणार आहे. प्रवीण कोळी आणि योगिता कोळी यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे. त्यांचे गोव्याच्या किनाऱ्यावर” हे गाणे तुम्हाला आठवत असेलच ते गाणे त्यांनीच संगीतबद्ध केले आहे. हे येणारं गाणं “आई” या नावाने आहे. शिवाय परी या गाण्यात एका शाळकरी मुलीच्या भूमिकेत तसेच दोन्ही बाजूला दोन वेण्या घातलेल्या आहेत. या गाण्यात ती “आईविना मला करमत नाही” ही गाण्याची ओळ म्हणताना दिसत आहे.

या गाण्यात मायराच्या गाण्याला आवाज दिया वाडकर या बाल गायिकेने. या दिया ने यागोदर ” माझा बाप्पा किती गोड दिसतो” हे गोड गाणे गायले आहे. तसेच परी सोबत अंकिता राऊत ही तिच्या आईच्या भूमिकेत दिसेल. स्नेहा महाडिक आणि हर्ष भोईर यांचा सुद्धा आवाज तुम्हाला या गाण्यात ऐकू येईल. हे गाणं प्रवीण कोळी यूट्यूब चॅनलवर १२ मार्च रोजी संध्याकाळी प्रदर्शित होईल.

बघुया या दोन बाल कलाकारांचे हे गाणे चाहत्यांना आवडते का? याशिवाय प्रवीण आणि योगिता कोळी यांनी गाण्याला संगीत दिलं आहे त्यामुळे खरचं हे गाणं खूप सुंदर होईल याबद्दल शंका नाही.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *