बातमी

चौथ्या पोर्टच्या ब्रिजच्या पायलींगच्या कामामुळे उरण मधील आई रत्नेश्वरी देवीच मंदिर धोक्यात

उरण शहरातील साडे तीन शक्तीपीठ पैकी एक शक्तीपीठ म्हणून जसखार गावातील रत्नेश्वरी आईच मंदिर विख्यात आहे. आगरी, कोळी लोकांची आई म्हणून उरण शहरात ह्या मंदिराची ओळख आहे. चैत्र महिन्यात होणाऱ्या जत्रेची ख्याती फक्त उरण तालुक्यापुरती मर्यादित नसून रायगड जिल्ह्यापर्यत आहे. हजारो भाविक ह्या यात्रेसाठी लांबून येतात.

पण ह्याच मंदिरावर सध्या संकट कोसळलं आहे. उरण मध्ये जेएनपीटी हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे पोर्ट आहे हे तुम्हा आम्हाला माहितीच आहे. पण आता ह्याच ठिकाणी चौथ्या पोर्टला सुद्धा सुरुवात झाली आहे. ह्याच कामामुळे आई रत्नेश्वरी मंदिराच्या मागच्या भागाला तडे गेले आहेत. आणि हे काम असेच चालू राहिले आणि पूर्ण होऊन इथून मालवाहतूक, जड वाहने सुरू झाली मंदिराची काय अवस्था होईल हे शब्दात सुद्धा व्यक्त करू शकत नाही.

जसखार ग्रामपंचायत ही सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून उरण शहरात ओळखली जाते. इथल्या स्थानिकांनी मिळून पैसा जमा करून नव वर्षांपूर्वी साडे चार कोटींचे हे मंदिर उभारले होते. आणि हेच मंदिर धोक्यात आलं आहे. पुन्हा एवढं मोठं मंदिर उभारणे शक्य नाही. ह्यासाठी खूप वेळ आणि खर्च जाऊ शकतो. आई सोबत इथल्या लोकांची नाळ जोडली गेली आहे. मंदिरावर आलेले हे संकट लोकांना पाहवत नाहीये. ह्या आधी सुद्धा हे मंदिर स्थानांतर केलं होतं.

चौथ्या पोर्टचा जो मार्ग आईच्या मंदिराच्या मागून चालला आहे त्या मार्गाला जसखार ग्रामपंचायतने परवानगी दिली नव्हती आणि तरीसुध्दा हे काम सुरू करण्यात आले. याबाबत अनेकवेळा जेएनपीटी प्रशासनाला सांगण्यात आले पण त्यांनी सुद्धा ह्या गोष्टीकसे दुर्लक्ष केलं. त्यामुळे आता सर्व जसखारकर मिळून उरण-रायगड मधील सर्व जनतेला(देवीच्या भक्तांना) आवाहन करत आहेत की रत्नेश्वरी देवीचे मंदिर वाचवण्यासाठी आम्हाला शक्य तेवढी मदत करावी.

काहीच दिवसांपूर्वी जसखार गावातील युवा सामाजिक संस्था यांनी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री श्री कपील पाटील साहेब यांच्या सोबत त्यांच्या भिवंडी येथील निवासस्थानी या संदर्भात भेट घेतली व सकारात्मक चर्चा झाली. केंद्रीय मंत्री श्री कपील पाटील साहेबांनी युवा सामाजिक संस्था जसखार यांना पाठिंबा देऊन मंदिरासाठी सर्वोत्तोपरी मदत करण्याचे आश्वासन सुद्धा दिले. आणि या चर्चेदरम्यानच J.N.P.T चे चेअरमन श्री संजय सेठी साहेब यांना श्री कपील पाटील साहेबांनी दूरध्वनीद्वारे त्यांच्याशी चर्चा करून त्यांना देवीच्या मंदिरा संदर्भात लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेऊन हा विषय मार्गी लावण्यासाठी आदेश दिले.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *