मनोरंजन

प्रत्येक जोडीदाराने पहावी अधी आणि काय हवं सिरीज

अशा अनेक सीरिज नेहमीच येत असतात त्या तुम्ही पाहता पण ही तुम्ही आणि काय हवं ही सीरिज पहिली आहे का? हिचे दोन भाग आधीच झालेले आहेत. पहिले दोन भाग बघाल तर एकदम उत्तम आहेत. तुम्हाला शेवट पर्यंत खिळवून ठेवतील. आणि आताचा आलेला नवीन भाग म्हणजे “आणि काय हवं” सिजन 3 हा सुध्दा तितकाच आनंद देणारा आहे.

यात असणारे आपले आवडते अभिनेते उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट आहेत. त्यांचं या सीरिज मध्ये नाव साकेत आणि जुई आहे. अर्थात हे दोघे जसे सीरिज मध्ये नवरा बायको आहेत तसे खऱ्या आयुष्यात ही ते नवरा बायकोच आहेत. या मालिकेत तुम्हा संसाराचे अनेक पैलू पाहायला मिळतील. म्हणजेच सुख आणि दुःखाचे भाग तसेच तुम्हाला हसवणारी हलकी फुलकी कॉमेडी ही यात पाहायला मिळेल.

ही वेब सीरिज तुम्हाला मॅक्स प्लेअर वर पाहायला मिळेल. यामधे सर्व भागात बहुतेक करून हे दोघेच पाहायला मिळतील. मधे मधे कोणीतरी कॅरेक्टर असणार आहेतच. यामधे हे दोघे दिवसभराचे ऑफिस मधली काम, त्याचबरोबर चिडचिड, शिवाय ताणतणाव बॉस बद्दलच्या गोष्टी हे सगळं सांभाळून घर कसं सांभाळायचं हे पाहायला मिळेल.

नात्यात येणारी भांडणे, राग रुसवे फुगवे, प्रेम अशा अनेक गोष्टींवर प्रखरतेने विचार मांडले आहेत. ही शॉर्ट फिल्म पाहताना अनेक गोष्टी मध्ये तुम्ही स्वतला सामावून घ्याल आणि अनेकदा तुमच्या जोडीदाराकडे बघून इशाऱ्यानेच सांगाल हे बघ तू हे असे करतोस. एवढी ताकत ह्या सिरीज मध्ये आहे.

Previous ArticleNext Article

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *