श्रेयस तळपदे आता पुन्हा चित्रपट सृष्टीकडे वळताना दिसत आहे. सध्या तो ” माझी तुझी रेशीमगाठी ” या मराठी मालिकेत पाहायला मिळत आहे त्यातील त्याची भूमिका चाहत्यांना खूपच आवडलेली आहे. पण आता सध्या तो एका नवीन चित्रपट मध्ये येत आहे अशी घोषणा त्याने स्वतः आपल्या चाहत्यांना दिली आहे. त्या चित्रपटाचे नाव आहे ” आपडी थापडी”.
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या टीझर मध्ये तुम्हाला कोणाचाही चेहरा दिसत नाही त्यात फक्त हात आणि त्याच्या साहाय्याने प्राण्याचे चित्र काढताना दिसत आहे. तेच चित्र ती तिच्या बाबांना काढायला सांगत आहे. यांची भिंतीवर पडलेली सावली आणि श्रेयस मुक्ता आणि त्या लहान मुलीचा असावी एवढंच काय ते पाहायला मिळत आहे. टिझर वरून कळते ही हा चित्रपट एक कौटुंबिक चित्रपट आहे त्यात आपल्याला कुटुंबाची कथा पाहायला मिळणार आहे.
या चित्रपटात श्रेयस सोबत मुक्ता बर्वे ही अभिनेत्री तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर संदीप पाठक, नंदू माधव, नवीन प्रभाकर हे अभिनेते ही पाहायला मिळतील. याशिवाय अजून एक बालकलाकार आपल्याला या चित्रपट मध्ये पाहायला मिळणार आहे ती मुलगी आपल्याला या मध्ये श्रेयस आणि मुक्ता या दोघांची मुलगी म्हणून पाहायला मिळणार आहे तिचे नाव आहे खुशी हजारे. याचे दिग्दर्शन आनंद करीर यांनी केलेले आहे.
खुशीने भूत, शजबजाणा हे हिंदी चित्रपट तसेच वजनदार आणि प्रवास हे मराठी चित्रपट केले आहेत. तसेच मुक्ता बर्वे ही सुद्धा “अजूनही बरसात आहे या मराठी मालिकेत दिसत आहे. बघू या या कलाकारांचा हा नवीन चित्रपट कोणती नवीन स्टोरी घेऊन येत आहे.