स्टार प्रवाह वर येणारी ही मालिका प्रेक्षकांच्या अत्यंत आवडीची मालिका आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र उठावदार पणे आपले काम करत आहे. त्यातील आई ही मुख्य भूमिकेत असली तरीही प्रत्येक पात्र हीट झाले आहे. यातील दोन महत्वाचे पात्र म्हणजे अभी आणि अनघा हे सुध्दा प्रेक्षकांना तितकेच आवडत आहेत. तर आज बघुया या दोघा बद्दल च्या आयुष्याबद्दल खऱ्या गोष्टी.
अनघा आणि अभी यांची सध्या वाटचाल लग्नाच्या वळणावर येऊन थांबली आहे. बघुया पुढे कोणते वळण मिळणार आहे. अनघा हीचे खरे नाव अश्विनी महांगडे ती राहणार सातारा, वाई मधील आहे. तिचे शिक्षण ही तिथेच झालेले आहे. याशिवाय तिने हॉटेल मनेजमेंट चे शिक्षण ही घेतले आहे.
झी मराठी वरील अस्मिता ही तिची पहिली मालिका होय. आणि नंतर गाजलेली मालिका म्हणजे स्वराज्यारक्षक संभाजी होय. चला हवा येऊ द्या मध्ये ही ती दिसली आहे. तसेच तिने वेबसिरीज आणि मराठी चित्रपट टपाल, बॉईज ही केले आहेत. याचसोबत तिने स्वतःचे प्रॉडक्शन्स हाऊस ही काढले आहे.
आता आपण बघुया अभी म्हणजेच निरंजन कुलकर्णी याच्याबद्दल काही गोष्टी. अभी हा मूळचा राहणारा अंबरनाथ मधील आहे. त्याने मकेनिकल इंजिनियर ची पदवी घेतली आहे. शिकत असताना तो एकांकिका आणि नाटकामध्ये भाग घ्यायचा त्यानंतर त्याला २०१२ मध्ये उंच माझा झोका ही झी मराठी वरील मालिका मिळाली. तू माझा सांगाती, आपला बुवा असं आहे, गणपती बाप्पा मोरया, जावई विकत घेणे आहे, तू अशी जावळी रहा या मालिका केल्या आहेत.
अभी आणि अनघा ह्यांच खऱ्या आयुष्यात सुद्धा लग्न होणार आहे अशा काही अफवा सोशल मीडियावर फिरत आहेत. पण हे साफ चुकीचे आहे. त्यांचं लग्न हे फक्त मालिकेत होणार आहे.