फिल्म इंडस्ट्री मधील अनेक ज्येष्ठ तसेच तरुण कलाकारांना कॅन्सर हा रोग तसा नवीन नाही, अनेकांना हा झालेला आहे शिवाय काही जण यातून बरेही झाले आहेत. सध्या एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ती म्हणजे अभिज्ञा भावेची. तिचा पती मेहुल पै याला कॅन्सर झाला आहे आणि तो आपल्या आजाराशी झुंज देत आहे मेहुल ने स्वतःही पोस्ट आपल्या अकाउंटवर शेअर केली आहे त्यामुळे अभिज्ञा हिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
त्या फोटो ला त्याने कॅप्शन दिले आहे. ” मला अनेक मूर्ख लोक भेटले पण त्यापैकीच एक आहे कॅन्सर. माफ कर कॅन्सर पण तू चुकीच्या व्यक्तीला निवडलं आहेस. गेल्या वर्षीच म्हणजे ६ जानेवारी २०२१ ला हे दोघे लग्नाच्या बेडीत अडकली होते ते दोघे एकाच कॉलेज मध्ये शिकत होते त्यांची दोघांची घट्ट मैत्री होती. पण कॉलेज संपले दिघे वेगळे झाले नतर अचानक दोघांची भेट झाली मैत्री तर होतीच त्याचे प्रेमात रूपांतर झाले. लग्नानंतर ही तिच्या नवऱ्याला कोरोनाची लागण झाली होती पण त्यातूनही तो बरा झाला होता.
दोघेही घटस्फोटित होते त्यांच्या लग्नामुळे त्यांच्या दोघांच्या जीवनाला नवीन उमेद मिळाली होती. शिवाय तिचा नवरा मेहुल हा १२ वर्षांपासून ‘क्लॉकवर्क्स इव्हेंटस प्रायव्हेट लिमिटेड’मध्ये तो ऑपरेशन्स कंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. अभिंज्ञा ही आता झी मराठी वर येणारी नवीन मालिका “तेव्हा तू तशी” यात पाहायला मिळणार आहे.
तिच्या नवऱ्याने मेहुल ने शेअर केलेल्या या फोटो ला पाहिलं सर्वच चाहते आणि कलाकार यांना धक्का बसला सर्वांनीच तो लवकर बरा होण्यासाठी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.