मनोरंजन

आदर्श शिंदे आणि त्याच्या बायको बद्दल जाणून घ्या

आदर्श यांचे घराणेच गायक असल्यामुळे त्यांनी जवळ जवळ वयाच्या अवघ्या १० व्या वर्षापासून गायकीला सुरुवात केली. सुरेश वाडकर हे त्यांचे गुरू आहेत. याशिवाय त्यांना “दुनियादारी” या मराठी चित्रपट असणारे “देवा तुझ्या गाभाऱ्याला” त्याला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी मराठी आणि हिंदी भाषेतील गाणी गायली आहेत.

त्यात तू ही रे, पोस्टर गर्ल, टाईमपास, फांदी, धुरळा, खारी बिस्कीट इत्यादी चित्रपट मध्ये त्यांनी गाणी गायली आहेत. “मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे” हे त्याचे गाणे सुपरहिट ठरले आहे. म्हणजेच तो किती उत्तम गायक आहे हे सिद्ध झाले आहे. त्याच्या आवाजात एक वेगळी जादू आहे. मग गे गाणं धिंचाक असो किंवा रोमँटिक, प्रत्येक परिस्थितीला त्याचा आवाज अगदी आपलासा वाटतो.

आदर्श शिंदे बद्दल आपल्याला अनेक गोष्टी माहीत आहेत पण त्याच्या वयक्तिक आयुष्याबद्दल खूप कमी लोकांना माहीत आहे. त्याची बायको नेहाबद्दल आपण आज काही गोष्टी पाहणार आहोत. आदर्श शिंदेला लहानपणापासून गाण्याची खूप आवड होती शिवाय त्यांच्या घरातच गाण्याचे बाळ कडू रुजले आहे.

त्यांचा जन्म मुंबई मध्ये झाला. शिवाय वडिलांचे नाव आनंद शिंदे आहे. मिलिंद शिंदे हे आदर्श यांचे काका याशिवाय गायक प्रल्हाद शिंदे हे त्याचे आजोबा आहेत. गायक असल्यामुळे कॉलेजमध्ये ही त्याचे कार्यक्रम व्हायचे. कॉलेज मधीलाच एका युथ फेस्टिवलमध्ये आदर्श आणि नेहा या दोघांची ओळख झाली.

नेहाला ही गाण्याची आवड फार होती ती गायिका आहे. त्यामुळे या काळात त्यांची तासनतास प्रॅक्टिस ही चालत असे. त्यांच्यात गप्पा गोष्टी व्हायच्या पण त्या ही गाण्यावरून. नेहाला आदर्श हा आनंद शिंदे यांचा मुलगा आहे हे माहीत नव्हते. त्यानंतर त्या दोघांच्यात जवळीक वाढू लागली जास्त भेटू लागले. फोन वर बोलू लागले. नंतर एकमेकांना प्रेमाची जाणीव झाली आणि प्रेम व्यक्त केले दोघांनी आपल्या घरातल्याच्या सहमतीने लग्न केले.

२७ मे २०१५ रोजी मुंबई मध्ये त्या दोघांचा विवाह संपन्न झाला. ह्यानंतर त्यांना कन्यारत्न झाले. तिचे नाव अंतरा शिंदे आहे. अत्यंत कमी वयात ती सुद्धा आपल्या नाजूक आवाजाने सर्वांना अचंबित करते. तिचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाले आहेत. तुम्ही पाहिलेच असेल.

आनंद शिंदेचे सध्या मी नादखुळा आणि आपली यारी ही दोन मराठी गाणी सोशल मीडियावर तुफान वायरल आहेत. प्रत्येक युवा पिढीला ही गाणी थिरकायला लावत आहेत.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *