स्टार प्रवाह या वाहिनीवर काही मालिका नव्याने सुरू झाल्या आहेत. त्यात तुम्हाला अजून नवीन कलाकार पाहायला मिळतील त्यातील एक म्हणजे संकर्षण कऱ्हाडे या लोकप्रिय अभिनेत्याचा धाकटा भाऊ अधोक्षण कऱ्हाडे हा “पिंकीचा विजय असो” या मालिकेत दिसणार आहे. पिंकीची भूमिका करणारी अभिनेत्री म्हणजे शरयू सोनवणे होय.
हा बंटी एकदम बिनधास्त आणि मस्त असा तरुण असून तो या मालिकेत पिंकीच्या मित्राच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. या मालिकेत तुम्हाला सुरुवातीलाच पाहायला मिळेल की बंटी चे पिंकी म्हणजे या मालिकेतील अभिनेत्रीवर एकतर्फी प्रेम नसते हे एकतर्फी प्रेम तुम्हाला या मालिकेत पाहायला मिळेल.
संकर्षण कऱ्हाडे याने आपल्या जुळ्या मुलांना दिली अनोखी नावं. इथे क्लिक करून वाचा.
पिंकीच जगच निराळं दाखवलंय तिची फिल्मी दुनिया तिला स्वप्न दाखवत असते. हे फिल्मी दुनियेचे तिच्या रोजच्या राहणीमानात दिसत असते. तिची इंग्लिश बोलण्याची एक वेगळीच स्टाईल तुम्हाला दिसून येईल. फिल्मी दुनियेचे वेड असणारी पिंकी आपले स्वप्न पूर्ण करते का ते या मालिकेत पाहायला मिळेल.
अधोक्षन याने अगोदर “छोटी मालकीण आणि लक्ष या मालिकेत काम केले आहे. याशिवाय झी मराठी वरील शो महाराष्ट्राचा सुपरस्टार यामधे ही भाग घेतला होता. सोमवार ते शनिवार रात्री अकरा वाजता ही मालिका स्टार प्रवाह या वाहिनीवर पहा.