हेल्थ

कोल्ड्रिंक्स पिण्याचे जसे तोटे आहेत तसे फायदे ही आहेत

अगदी लहान मुलांपासून सध्याच्या काळात कोल्ड्रिंक्स पितात. काहींना तर इतकी सवय असते की जेवणासोबत पाण्याऐवजी कोल्ड्रिंक्स पिनेच पसंत करतात. पण ही कोल्ड्रिंक्स थोड्या प्रमाणात घेतली तर ठीक पण जास्त पुल्ल्याने ही त्याचा तोटा आपल्या शरीराला होतो. हल्ली कोल्ड्रिंक्सची अनेक उत्पादने सगळ्या दुकानांमध्ये उपलब्ध असतात त्यात कोको कोला, पेप्सी, स्प्राइट, माझा, फ्रूटी, मिरींडा ह्या कोल्ड्रिंकस आपण आवडीने पित असतो जास्त करून उन्हाळ्यात आपली तहान तर भागवतात शिवाय शरीराला ताजेतवाने वाटते.

कोल्ड्रिंक्स मध्ये कॉफी प्रमाणे कॅफेन असते त्यामुळे तुमची मज्जासंस्था ठीक राहते. कोल्ड्रिंक्स मध्ये सोडियम ही मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे तुमच्या शरीरातील पाणी धरून ठेवण्याची क्षमता त्यात आहे. त्यामुळे हाता पायांना वळ (cramp) येतं नाही. कोल्ड्रिंक्स मध्ये कार्बोनेट पाणी असते त्यामुळे पोटात गॅस होत नाही. घरात ठेवलेले जुने दागिने या कोल्ड्रिंक्स ने स्वच्छ करू शकता.

बघा नुकसान किती आहेत. कोल्ड्रिंक्स मध्ये ऍसिड असते ते आपल्या दाताना कमजोर करते तसेच फॉस्पोरस ऍसिड असते शिवाय हाडे ही कमजोर होतात. कोल्ड्रिंक्स जास्त पिल्ल्याने तुमची जाडे पणाची समस्या वाढते. सतत कोल्ड्रिंक्स पिल्ल्याने मायग्रेन, मेमोरी लॉस, निद्रानाश अशा समस्या होऊ शकतात.

या कोड्रिंक मध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्यामुळे रोज कोल्ड्रिंक्स पिल्ल्याने तुमच्या शरीरात रक्तातील साखर वाढते आणि २ टाईप डायबेटिस होऊ शकतो. यात असणारे जास्त साखरेचे प्रमाण तुमच्या लिव्हरला ते पचवायला अधिक कठीण जाते त्यामुळे हळू हळू तुमचे लिव्हर कमजोर होऊ शकते.

म्हणूनच कोल्ड्रिंक्स प्या पण थोडक्यात आवरा जास्त कोल्ड्रिंक्स पिने आपल्या शरीरासाठी घातक आहे. खरतर पाहायला गेलात तर ज्याच्यात्याच्या आवडीचा विषय आहे हा पण जर तुम्ही आवडीने कोल्ड्रिंक्स घेता तर ती लिमिट मध्ये असावी. त्याचा अतिरेक नसावा. कारण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नेहमी वाईटच असतो.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *