बातमी

गोल्ड मेडल जिंकल्यानंतर नीरज चोप्रावर पैस्यांचा पाऊस

काल नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकून संपूर्ण देशाला एक भलं मोठं गिफ्ट दिलं आहे. कोणत्याही Athletics खेळात गोल्ड मेडल जिंकण्याची भारताची ही पहिलीच वेळ त्यामुळे सर्वच स्तरावरून नीरजचे कौतुक होत आहे. काल संपूर्ण देशाने जणू दिवाळी साजरी केली.

नीरज चोप्राने सुवर्णभेद करत पहिल्याच प्रयत्नात सर्वात लांब (८७.५) फेकत गोल्ड मेडल पटकावलं होतं. त्यानंतर कुणीच त्याच्यापेक्षा लांब भाळा फेकू शकला नाही. एवढ्यात दिमाखात नीरजने सर्वांना चीत करून टाकले. पानिपतच्या या मुलाने सर्वांना पानिपत करून टाकले. त्याच्या विजयानंतर अनेकांनी जशा शुभेच्छा दिल्या तशाच प्रकारे बक्षिसांचा वर्षाव सुद्धा केला आहे.

गोल्ड मेडल जिंकल्यानंतर जणू नीरजवर पैश्याचा पाऊस पडत आहे. ह्याची सुरुवात हरयाणाचे मुख्यमंत्री धनलाल खट्टर यांनी सुरू केली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकलेल्या सर्व खेळाडूना मिळून ६ करोड देण्याची घोषणा त्यांनी केली. आणि त्यासोबत क्लास वनची नोकरी पण देण्यात येईल. कॅप्टन अमिंदर सिंगने सुद्धा निरजला दोन करोड देण्याची घोषणा केली आहे.

मणिपूर सरकारने सुद्धा निरजला एक करोड देण्याची घोषणा काल मणिपूर कॅबिनेट बैठकीत झाली. याचबरोबर महेंद्र सिंग धोनी नेतृत्व करत असलेल्या चेन्नई सुपर किंग संघाने एक करोड तर बीसीसीआयने निरजसाठी एक करोड आणि चाणू, रवी दहिया ५० लाख आणि पी वी सिंधू आणि बजरंग पूनियाला २५ लाख देण्याची घोषणा केली आहे. तर कांस्य पदक जिंकलेल्या भारतीय हॉकी संघाला सुद्धा बक्षिसे जाहीर केली आहेत.

भारतीय एअरलाईन इंडिगोने सुद्धा निरजसाठी एक वर्ष मोफत प्रवास असे जाहीर केलं आहे. आमच्या एअरलाईन मधून ते देश विदेशात कुठेही मोफत प्रवास करू शकतील असेही त्यांनी म्हटलं. याचसोबत महिंद्रा ग्रुपचे चैरमन आनंद महिंद्रा ह्यांनी निरजसाठी XUV 700 गिफ्ट करायची घोषणा केली आहे.

ही तर सुरुवात आहे निरज चोप्रा याच्यावर अजून बक्षिसांचा वर्षाव होणार आहे. कारण त्याने जिंकून आणलेलं गोल्ड मेडल भारतासाठी एक संजीवनी आहे. कारण अनेक युवक आता ह्या खेळांकडे येतील आणि भविष्यात आपल्याला चांगले खेळाडू मिळतील.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *