मनोरंजन

ही मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका नेहमीच लोकांच्या चर्चेचा विषय असतात. पण काही मालिकांचे विषय आणि कथानक एवढे लांबणीवर नेतात की विषय कंटाळवाणा वाटू लागतो. अगबाई सूनबाई ही मालिका सध्या तरी प्रेक्षकांच्या पचनी पडत नाही आहे. त्यामुळे याचा प्रेक्षकवर्ग ही कमी झाला आहे.

पहिले जेव्हा ही मालिका चालू झाली होती तेव्हा त्यात मेन रोल मध्ये असणारी शुभ्रा म्हणजेच तेजश्री प्रधान हीची भूमिका सर्वानाच आवडायची तिच्या अभिनयात एक खरी सून होती बघायला ही लोकांना आवडायचे पण सध्याची मालिका पूर्णपणे बदलली आहे.

नव्याने चार महिन्यांपूर्वी सुरू झाली आहे तसेच ही मालिका पूर्णपणे बदलली आहे. याशिवाय यातील अनेक कॅरेक्टर ही बदलले आहेत शुभ्रा, बाबड्या, हे दोन्ही कॅरेक्टर बदलल्यामुळे ह्या मालिकेवर प्रेक्षकांनी खूप टीका केली. तसेच आजोबा हे सर्व कॅरेक्टर बदलण्यात आले आहेत शिवाय मालिकेचे नाव पण बदलण्यात आले आहे. तसेच पूर्ण मालिकाच बदलण्यात आली आहे. कदाचित तेच प्रेक्षकांना आवडेल नसेल.

नवीन दाखवली गेलेली शुभरा अतिशय कमजोर आणि स्वतःचा काहीच विचार न करणारी एक गृहिणी दाखवली आहे हे प्रेक्षकांना मुळीच आवडले नाही. शिवाय सोहम ही प्रेक्षकांना आवडलेला नाही. त्यामुळे ही मालिका लवकरच गुंडाळण्याचा निर्णय घेतलेला आहे. सध्या ही मालिका खूप फास्ट पुढे धावत आहे आणि ऑगस्ट मध्ये हीचा शेवट होणार आहे.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *