बातमी

दोन्ही हात नसलेल्या सात वर्षाच्या मुलाचा डान्स पाहिलात? अचंबित व्हाल

नागोर जिल्ह्यातील मकराणा ह्या गावातील सात वर्षाचा अहमद रजा हा सध्या सोशल मीडियावर वायरल झाला आहे. ह्याचे कारण आहे त्याचे नृत्य. आता तुम्ही म्हणाल नृत्य तर सर्वच करतात की त्यात काय वेगळं? पण मित्रांनो इथे वेगळी गोष्ट आहे कारण ह्या लहानग्या अहमद रजाला दोन्ही हात नाही आहेत पण ह्याचे दुःख अजिबात त्याला नाहीये. त्यांच्या नृत्यात तुम्हाला हे कधी जाणवणार सुद्धा नाही की त्याला हात नाहीत.

त्याचे काही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान वायरल आहेत. अनेक न्यूज वाहिन्यांनी त्याच्या घरी जाऊन मुलाखती सुद्धा घेतल्या आहेत. रातोरात स्टार होणं म्हणतात ना तसेच काहीच ह्या मुलाच्या वाट्याला आलं आहे. पण ह्या मागचा संघर्ष खूप मोठा आहे. अहमदचा जेव्हा जन्म झाला तेव्हा त्याला दोन्ही हात नव्हते. पायात सुद्धा समस्या होती.

सगे सोयरे, नातेवाईक ह्यांनी ह्या मुलाला अनाथाश्रम मध्ये सोडून येण्याचा सल्ला दिला पण त्याच्या वडिलांनी कुणालाही न जुमानता माझ्या मुलाला मी स्वतः मोठा करेन असे ठामपणे सांगितले. मार्बल क्षेत्रात मोलमजुरी करणाऱ्या त्याच्या वडिलांनी आपल्याला मुलाला इतरांपेक्षा वेगळं काही करून दाखवायची नेहमी शिकवण दिली. ह्यासाठी त्यांनी अनेक कष्टही घेतले.

खुदा की अमानत है हमारा लडका असे समजून त्यांनी त्याचे पालनपोषण सुरू केलं. अहमद रजाला लहानपणापासून नृत्याची आवड होती म्हणून त्याच्या वडिलांनी ह्याच त्याच्या विशिष्ट शैलीकडे लक्ष दिलं. ह्यासाठी ते मकरानी ते कुचामन असा २७ किमी प्रवास रोज करतात. रजाला डान्समध्ये प्रावीण्य करण्याची जबाबदारी डांस प्रशिक्षक आशीष रावल आणि निर्मल चौहान ह्यांनी घेतली आहे.

Source Social Media

जेव्हा पहिल्यांदा तो त्यांच्याकडे आला तेव्हा त्यांनाही वाटलं होतं तो नाही नाचू शकत पण त्यांना सुद्धा ह्या मुलाने खोटं ठरवलं. प्रत्येक स्टेप तो लगेच शिकतो हीच त्याची खासियत आहे असे त्याचे प्रशिक्षक सांगतात. काहीच महिन्यापूर्वी त्याने संपूर्ण भारतात ऑनलाईन झालेल्या डान्स स्पर्धेत भाग घेतला होता. ह्यात त्याचे गुरू सुद्धा सोबत होते.

ह्या स्पर्धेत तो दुसऱ्या क्रमांकावर राहिला. इथूनच त्याच्या प्रसिद्धीला सुरुवात झाली. आता संपूर्ण भारत त्याला ओळखत आहे. मेहनतीचे फळ आपल्याला कधी ना कधी मिळतेच. फक्त त्यासाठी योग्य वेळ यावी लागते.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *