सध्या स्टार प्रवाह या वाहिनीवरील बऱ्याच मालिका लोकांना आवडत आहेत. त्यांच्यातील वेगवेगळे विषय ही तितकेच आवडत आहेत. या सगळ्या मालिकांच्या फुलाला सुगंध मातीचा ही मालिका ही तितकीच लोकप्रिय झाली आहे. या मालिकेचा विषय तितकासा वेगळं नाही पण हा यालिकेत शिक्षणाचं महत्त्व खूप चांगल्या पद्धतीने मांडला आहे.
शिवाय नेहमी प्रमाणे सासू सूनेतली भांडण आहेतच या मालिकेत जशी चांगली सून म्हणून कीर्ती आहे तशीच एक वाईट सून म्हणून सोनाली आहे. तिने हे काम अगदी उत्तम केले आहे. चला तर बघुया आज तिच्याबद्दल बरच काही.
घरात नेहमी लावा लावी करणारी आणि त्यातून भांडणे उकरून काढणारी कामात नेहमी कामचुकार पणा करणारी या मालिकेतील सून म्हणजे सोनाली होय. तिने जरी नकारात्मक भूमिका केली असली तरी ती प्रेक्षकांना मनापासून आवडली आहे. या अभिनेत्रींचे नाव आहे ऐश्वर्या शेट्टे आहे. तसेच याअगोदर ही तिने अनेक नाटकांमधे तसेच मालिकांमध्ये काम केले आहे. ती सध्या ठाण्याला राहते आहे आणि तिचे वय 20 वर्ष आहे.
जे आहे ते आहे या नाटकामध्ये तिने काम केले आहे. याशिवाय कलर्स मराठी या वाहिनीवरील घाडगे अँड सून या मालिके मध्ये ही ऐश्वर्या आपल्याला दिसलेली. या मालिके मधूनच तिचे टीव्ही मध्ये पदार्पण झाले. तसेच झी युवा या वाहिनीवर ऑल मोस्ट सुफळ संपन्न या मालिकेत ही ती दिसते आहे. या मालिकेमध्ये रीची ही भूमिका ही लोकांना आवडत आहे.