बातमी, मनोरंजन

अजूनही बरसात आहे मालिका या दिवशी घेणार प्रेक्षकांचा निरोप

सध्या सोनी मराठी वाहिनीवर चालू असलेली मालिका “अजूनही बरसात आहे” ही लोकांना आवडत आहे. त्यातील तगडे कलाकार त्यांचा मुरलेला अभिनय यावर या मालिकेने प्रेक्षक एकवटले होते. उमेश कामत आणि मुक्ता बर्वे यांसारखे कलाकार या मालिकेत असल्यामुळे प्रेक्षक आपोआप या मालिकेला वळले होते.

ही मालिका १२ जुलै २०२१ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आलेली होती या मालिकेत थोडी हटके अशी स्टोरी दाखवण्यात आलेली असल्याने प्रेक्षकांना ते आवडले. नेहमी सारखी प्रेम कहाणी पण तिला वयाची झालर लावली होती. आदिराज आणि मिरा हे दोन्ही वयाच्या चाळिशी मधले त्यांची प्रेम कहाणी दाखवली होती.

Source Umesh Kamat Social Handle

शिवाय आता त्यांचे लग्न ही झाले आहे. त्यानंतर मात्र घरातील भांडणे त्यातून निघणारे उपाय या सर्वावर आधारित हो मालिका जरी आता प्रेक्षकांना आवडू लागली असली तरी आता अचानकपणे या मालिकेवर बोजा बिस्तारा गुंडाळण्याची वेळ आली आहे ते ही अवघ्या सात महिन्यात. या मालिकेचा शेवटचा शुट्टींग संपविण्यात आले आहे. त्यावेळी यातील सर्वच कलाकार भावूक झालेले दिसले.

त्यामुळे आता या मालिकेच्या जागी येत्या १४ मार्च ला ” हे सुंदर आमचे घर” ही नवीन मालिका चालू होणार आहे. या मालिकेची वेळ रात्री ८ वाजता असणार आहे. शिवाय यात संचीता कुलकर्णी, सुकन्या मोने, संयोगिता बर्वे हे कलाकार दिसतील. या मालिकेत सासू आणि सून अशा कुटूंबीक कहाणीवर आधारित कसे कथानक असणार आहे.

तर तुम्ही ” अजूनही बरसात आहे” या मालिकेच्या जाण्याने तिला मिस कराल का? कॉमेंट करून सांगा.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *