सैराट चित्रपटात आपल्या सर्वांच्याच पसंतीस उतरलेला चॉकलेटबॉय परश्या सर्वांनाच चांगल्या परिचयाचा आहे. पण बरेच दिवस तो कोणत्या मोठ्या प्रोजेक्ट मध्ये दिसला नसल्याने चाहत्यांना त्याच्या आगामी प्रोजेक्ट विषयी उत्सुकता होती. मात्र आता ती उत्सुकता संपली आहे. कारण आकाश एक आगळ्या वेगळ्या भूमिकेत आणि आपल्या आगळ्यावेगळ्या लुक मध्ये दिसणार आहे. आपल्या मराठमोळ्या दिग्दर्शक, महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘१९६२ – द वॉर इन द हिल्स’ ही वेबसीरिज २६ फेब्रुवारीला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
युद्धावर आधारित हा चित्रपट धमाल ठरणार आहे. आकाश यामध्ये एका सैनिकाच्या भूमिकेत दिसणार असून. या वेबसीरिजमध्ये आकाशबरोबरच, अभय देओल, सुमित व्यास मुख्य भूमिकेत दिसणार आहे.चीन आणि भारत युद्ध तर सर्वानाच माहीत आहे, त्यादरम्यान झालेली मोठी जीवित आणि वित्तहानी भरून काढण्यासाठी अनेक वर्षे गेली. त्या दरम्यान घडलेल्या एका रोमांचक कथेवर आधारित अशी ही सेरिस असणार आहे. यात अभय देओल देखील दिसणार आहे. या वेबसीरिजची कथा भारत-चीनमध्ये झालेल्या यु’द्धावर आधारित आहे.
दिगग्ज कलाकारांसोबत काम करताना कस वाटतंय, असे विचारले असता. नक्कीच दिगग्ज कलाकारांसोबत काम करताना नेहमीच छान वाटत, त्यापेक्षा जास्त दडपण देखील येत. मात्र आर्मी ऑफिसर होण्याचं माझं स्वप्न रियल लाईफ मध्ये तर पूर्ण होऊ शकलं नाही मात्र ऑन स्क्रिन ही माजा अनुभवायला मिळते आहे. त्यामुळे मी या सेरिस करतात फार एक्साईटेड आहे. ही वेबसीरिज म्हणजे आकाशसाठी सुवर्णसंधी आहे. या वेबसीरिजमधील आकाशचा लूक रिव्हील होताच. नव्या वेबसिरीस मध्ये देखिल तो सैनिकाच्या भूमिकेत दिसणार असल्याने त्याच्या चाहत्यांनी त्याला नव्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
या लूकमध्ये आकाश अगदी उठून दिसतोय. शिवाय त्याने या भूमिकेसाठी आपलं वजन देखील वाढवलं आहे. त्यामुळे आकाश खरोखरच एका जवानाच्या भूमिकेत उठून दिसतोय. या चित्रपटात अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करण्याची आकाशला संधी मिळणार आहे. मराठी दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर दिग्दर्शित. ‘१९६२: द वॉर इन द हिल्स’ ही वेब सीरिज येत्या २६ फेब्रुवारी रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होत आहे. आकाश भूमिकेबद्दल सांगताना भारावून गेला होता.
या सीरिजच्यानिमित्ताने मला ही संधी मिळत आहे. या वेबसीरिजच्या चित्रीकरणावेळी जेव्हा मी आर्मी ऑफिसरचा ड्रेस घालायचो तेव्हा माझं मन अगदी आनंदाने भरुन यायचं. सैनिकी रुबाब आपोआपच अंगात भिनला जायचा. मला अत्यंत खास वाटले. असे वाटले की, मी सै’न्याचाच भाग आहे आणि मी स्वत:कडे त्याच दृष्टिने पाहिन.’ तसेच या वेबसीरिजसाठी आकाश फारच उत्साही आहे. आणि तो यासाठी खूप मेहनत घेत आहे. अशा शब्दांत त्याने भावना व्यक्त केल्या. सीरिजमध्ये आकाश हा किशन नामक जवानाची भूमिका साकारत आहे.
चित्रपटाविषयी बोलताना आकाश म्हणाला की हे माझं ड्रीम प्रोजेक्ट आहे. कधीतरी सैन्यचा ड्रेस घालेन अशी इच्छा होती. ती आज पूर्ण झाली. मराठीत सुपरहिट ठरलेल्या सैराट या चित्रपटापासूनच आकाशने आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. अर्चि आणि परश्याच्या या नवख्या जोडीने फक्त मराठी इंडस्ट्रीच नाही तर अख्ख्या बॉलीवूड मध्ये आपलं गारुड उठवलं. अनेक भाषांमध्ये याचे अनुवाद झाले, चित्रपटातील गाणे तर साता समुद्रा पार पोहोचले. एवढ्या मोठ्या यशाचे मानकरी ठरलेलं हे दोन नवखे कलाकार मात्र त्या एका प्रोजेक्ट नंतर चर्चेचा विषय ठरले. त्यानंतर याना कोणते चित्रपट मिळणार. याविषयी कुजबुज सुरू झाली.
राष्ट्रीय पुरस्कार विजेती रिंकू राजगुरू आणि परश्या म्हणजे आकाश ठोसर दोघेही आता मोठ्या प्रोजेक्ट मध्ये झळकत आहेत. मराठी सोबतच आकाश आणि रिंकू ने हिंदी वेबसिरीस मध्ये देखील काम केले आहे. येणारया आगामी सिरीज करिता आता आकाशचा पूर्णच कायापालट झाला आहे.या हिंदी वेबसीरिजसाठी आकाशने आपल्या लूकवर मेहनत घेतली आणि त्याचा हा नवा लूक पाहून नेटकरी ही अवाक् झाले आहेत. आता लवकरचं आपल्या सर्वांचा लाडका परश्या बॉलीवूड मध्ये एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. नक्कीच त्याच्या आगामी वेबसिरीसची चाहत्यांना मोठी उत्सुकता आहे.
याआधीही आकाशने नेटफ्लिक्सच्या ‘लस्ट स्टोरीज’ चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. आतापर्यंत आकाशची एक तरुण रोमॅण्टीक हिरो म्हणून ओळख बनत असताना तो वेगवेगळ्या भूमिका साकारण्याचं. आव्हान पेलतो आहे. नागराज मंजुळे यांच्या आगामी येऊ घातलेल्या झुंड या चित्रपटात अमिताभ बच्चन असणार असल्याने या चित्रपटाची देखील मोठी उत्सुकता आहे.मात्र याही चित्रपटात आकाशला बिग बी सोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे आपल्या आगामी सर्वच प्रोजेक्ट साठी मी आणखी मेहनत घेणार असल्याचं देखील आकाशने म्हंटल आहे.