मनोरंजन

2021 विथ अक्षय ..!! पहा अक्षयच्या आगामी चित्रपटांची नावे आणि कहाण्या

अक्षय कुमार एकापाठोपाठ एक चित्रपट काढतच असतो. पहिला चित्रपट रिलीज होत नाही की दुसऱ्या चित्रपटाची घोषणा देखील होऊन जाते. बाकी ऍक्टर्स स्क्रिप्ट वाचून त्यावर विचारच करत असतील की अक्षय तेवढ्यात चित्रपट काढून रिलीज देखील करून टाकतो. एक मात्र आहे अक्षयच्या नावावर सर्वात जास्त वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट केल्याने रेकॉर्ड आहे. आणि लवकरच तो आपल्या कारकिर्दीत सर्वात जास्त चित्रपटांमध्ये काम केल्याचा देखील रेकॉर्ड बनवेल. एकापाठोपाठ एक त्याने चित्रपटांचा धडाका लावलेला असताना आपण त्याच्या येऊ घातलेल्या चित्रपटांविषयी जाणून घेऊया.

काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमारचा लक्ष्मी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता, प्रेक्षकांना या चित्रपटाकडून खूप अपेक्षा ही होत्या, मात्र संपूर्ण चित्रपट पाहिल्यावर प्रेक्षकांची काहीशी निराशा झालेली दिसली आहे. चित्रपट तितकासा प्रभाव पाडू शकला नसल्याने सोशल मीडियावर काहीशी नाराजी पाहायला मिळाली होती, मात्र यात सर्वात जास्त भाव खाऊन गेला तो शरद केळकर, शरद केळकरच्या अभिनयाने मात्र चित्रपटाचा चेहरामोहरा बदलून टाकला, शरदच्या बहारदार अभिनयाने त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. लक्ष्मी नंतर ही अक्षयचे लागोपाठ चित्रपट येऊ घातले आहेत. लक्ष्मी नंतर त्याचे लागोपाठ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येनार आहेत.

22 जानेवारी 2021 ला बच्चन पांडे हा चित्रपट येणार आहे.यात अक्षयच्या बरोबर क्रीती सेनॉन दिसनार आहे.

बच्चन पांडे हा 2014 मध्ये आलेल्या ” विरम ” या तामिळ चित्रपटाचा रिमेक असणार आहे. साऊथ मध्ये विरम या चित्रपटात अजितने मुख्य भूमिका बजावली होती त्याच भूमकेत अक्षय दिसणार आहे. त्यानंतर लगेचच 26 जानेवारीला अक्षयचा ऍक्शन थ्रिलर चित्रपट सुर्यवंशी  रिलीज होणार आहे. यात अक्षय कुमार सोबत कतरिना कैफ आणि टायगर श्रॉफ देखील दिसणार आहे. पाठोपाठ अक्षय चा पाहून कलाकार म्हणून रोल असलेला ” अतरंगी रे ” चित्रपट येणार आहे. यात मुख्य भूमिकेत सारा अलि खान आणि धनुष दिसतील. अतरंगी रे या चित्रपटात अक्षय पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार असूनही त्याने एका आठवड्याच्या शूटिंग साठी तब्बल 27 कोटी रुपये मानधन घेतल्याचं समजते.

त्यांनतर 2 एप्रिल 2021 ला  “बेल बॉटम ” येणार आहे यात अक्षय हुमा कुरेशी आणि  वाणी कपूर मुख्य भूमिकेत दिससणार आहेत. या चित्रपटाची चर्चा मात्र वेगळ्याच करणारे  रंगली होति कारण कोरोना काळात शूटिंग थांबल्याने निर्मात्यांना बऱ्याच नुकसानीला सामोरे जावे लागले होते. त्याचाच विचार करत अक्षयने या चित्रपटाच्या चित्रीकरणा साठी त्याचा अठरा वर्षांचा रेकॉर्ड मोडला आहे अक्षय ने या चित्रपटासाठी डबल शिफ्ट करत शूटिंग पूर्ण केले.

त्यानंतर  ” पृथ्वीराज” हा चित्रपट येणार आहे. यात अक्षय सोबत मनुषी छिल्लर दिसेल. पृथ्वीराज एक ऐतिहासिक चित्रपट असणार आहे कॉलेक्शनच्या बाबतीत हा रेकॉर्डब्रेक चित्रपट असेल असेही सांगण्यात येत आहे. निर्मात्यांच्या मते हा ऐक ऐतिहासिक रेकॉर्ड असेल या चित्रपटाच्या चित्रीकणासाठी 35 वेगवेगळ्या सेट्सची निर्मिती करण्यात आली आहे भरपूर ऍक्शन सिक्वेन्सने भरलेली असा हा चित्रपट असणार आहे. त्यामुळे कमाई ही रोकॉर्डब्रेक असेल असे सांगण्यात येते.यात अक्षय सोबत सोनू सूद देखील दिसणार आहे. त्यामुळे चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे.

असेही सांगण्यात येते के ” सुशांत सिंग राजपूत” या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसणार होता. मात्र आता त्याच्या पुढील चित्रीकरणाला सुरवात झाली आहे.  त्यानंतर 5 नोव्हेंबर ला अक्षयचा “रक्षाबंधन ” हा चित्रपट येणार आहे. पोस्टर मध्ये भावाबहिनी मधील प्रेम अधोरेखित केले गेले आहे ज्यात ” बेहने 100% रिटर्न देती है”  असे म्हंटले आहे. त्यावरून हा चित्रपट नातेसंबंधावरच आधारलेला असेल असे वाटते.

 या सर्वांमध्ये प्रेक्षकांना एकापाठोपाठ एक असे चित्रपटांची पर्वणीच मिळणार आहे मात्र आता सोशल मीडियावर अक्षयने ट्विट करता त्याच्या नव्या चित्रपटाचे पोस्टर रिलीस केले आहे. 2021 च्या शेवटी अक्षयचा ” राम सेतू” हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

पोस्टर रिलीस झाल्यावर मात्र प्रेक्षकांना या चित्रपटा विषयी भारीच उत्सुकता लागली आहे. यात अक्षय एका सामान्य माणसाच्या भूमिकेत दिसत आहे तर त्याच्यामागे प्रभू श्रीरामांची छबी दिसत आहे.अक्षयने याबाबत ट्विट करता आगामी चित्रपट येणार असल्याची घोषणा केली आहे. अक्षय एवढ्या पटापट चित्रपट काढतो तेवढा वेळ बाकी निर्माते स्क्रिप्टच वाचत असतील असे गमतीने म्हंटले जाते ते काही चूक नाही. अक्षयने ट्विट करत  म्हंटले आहे की ” या दिवाळीत महानायक प्रभु श्रीराम यांच्या पावन स्मृतीस युगा युगांपर्यंत निरंतन ठेवण्यासाठी एक असा सेतू बंधुया  जो आपल्याला युगायुगांपर्यंत आपल्या आगामी पिढीला जोडून ठेवील”. याच दृष्टीने आमचा छोटासा प्रयत्न – ” राम सेतू ” अशा आशयाचा ट्विट करत चाहत्यांना नव्या चित्रपटा विषयी सांगितले आहे.

अक्षय कुमार बॉलीवूड मधील सर्वात बिझी अभिनेता आहे. आणि त्याचा एक चित्रपट पूर्ण होत नाही की नवीन चित्रपटाची घोषणा देखील केली जाते. अक्षय कुमार याच सोबत सगळ्यात महागड्या अभिनेत्यांपैकी एक झाला आहे, एका वृत्तपत्रा नुसार त्याच्या येणाऱ्या आगामी चिटासाठी त्याने 100 करोड रुपये मानधन घेणार असल्याचं सांगितलं जातंय. अक्षयचे कॉमेडी मूविज खूपच पसंद केले जातात, तसेच ते बॉक्सऑफीस वर तगडी कमाई देखील करतात. आता  त्याचा आगामी चित्रपट बेल बॉटमही कॉमेडी सिक्वेन्स असणार आहे. हा ही चित्रपट मनोराजनांने भरपूर असेल असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *