हेल्थ

अळूच्या पानांचा काय परिणाम होतो आपल्या शरीरावर पहा

आता परिणाम म्हटलं की चांगले आणि वाईट असा अर्थ असतो पण अळूच्या पांनाचा आपल्या शरीरावर नेहमीच चांगला परिणाम होत असतो हे तुम्हाला माहीत नसेल. अळूची भाजी बाजारात विकत मिळते पण गावा ठिकाणी किंवा शहरात ही भाजी काही लोकं कुंडीत लावत असतात. या भाजीच्या पानाची अळू वडी केली जाते.

महत्वाची गोष्ट म्हणजे ही भाजी अनेक आजारांवर उपयुक्त आहे. पहिली म्हणजे या भाजीच्या सेवनाने पित्त कमी होतो. याशिवाय ही भाजी खाल्ल्याने आपल्या शरीरावर येणारा ताणतणाव ही कमी होत असतो. भाजीत कॅल्शिअम खूप जास्त प्रमाणत असते म्हणून ज्यांची कंबर किंवा शरीराची हाडे कमजोर झाली असतील तर अशावेळी ही भाजी नियमित खावी.

Source Instagram

तसेच या भाजीत व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते. व्हिटॅमिन ए च्या सेवनाने तुमची दृष्टी सुधारते, तसेच डोळ्यांनचे स्नायू ही मजबूत होतात. तुम्हाला जर दीर्घकाळ गुडघे दुखीचा त्रास असेल तर या पानाचे सेवन नियमित करा. या भाजीत असणारे मुबलक फायबर तुमचे वाढलेले वजन कमी करण्यास मदत करते. त्यामुळे ही भाजी खायला हवी.

तसेच या भाजीत लोह असते त्यामुळे आपल्या शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. या भाजीत सोडियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते त्यामुळे ही भाजी हाय बीपीच्या आजारावर अत्यंत फायदेशीर आहे. सध्याच्या काळात बीपी आजार बहुतेक जणांना झालेला दिसतो.

मधुमेह हा ही अत्यंत घातकी असा आजार आहे त्यामुळे तुमचा मधुमेह कंट्रोल मध्ये ठेवायचा असेल तर या अळूच्या पानाच्या भाजीचे सेवन करा. याशिवाय अळूच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी असते त्यामुळे तुमची प्रतिकार शक्ती वाढायला मदत होते. त्याचप्रमाणे या ही गोष्टी लक्षात ठेवा.

कच्या अळूचे पाने कधीच खाऊ नये त्यामुळे घशात जळजळ होऊ शकते. तसेच दमा आजार असलेल्या लोकांनी अळूची भाजी सेवन करू नयेत. शिवाय काहीना गॅसची समस्या असते अशांनी अळूची पाने खाऊ नये. भाजी कधीही शिजऊन खाऊ कच्ची खाऊ नये.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *