हेल्थ

पावसाळ्यात मिळणारी अळूची भाजी नक्की करून बघा

या भाजीचे कंद असतात ते पावसाळ्यात लावल्यावर त्याची भाजी तयार होते. ही कंदमुळे उपवासाला उकडतात तसेच या पांनांची भाजी किंवा वडी बनवली जाते. तुम्ही हे सर्व करतच असाल पण तरीही या भाजीत असणारे गुणधर्म तुम्हाला नक्कीच माहीत नसतील. गुणांनी परिपूर्ण असणारी ही अळूची भाजी फक्त पावसाळ्यातच उगवते आणि तिची चव ही तितकीच छान असते.

ही भाजी बारीक कापून वालाच्या बिर्ड्यामधे एकदम चविष्ट लागते ती खवखवायला नको म्हणून थोड आंबट टाका भरपूर लसणाची फोडणी द्या. त्यात भाजीचे दांडे ही कापून घ्या कापताना त्याच्या साला काढून टाका. कोकणात अळू चे फदफदे प्रसिद्ध आहे.

आताच्या काळात डोळ्यांची सर्वाधिक समस्या सर्वानाच उद्भवत असते त्यासाठी आवश्यक असणारे व्हिटॅमिन ए हे आपल्याला ह्या वळूच्या भाजितून मिळते. याशिवाय डोळ्यांमध्ये असणाऱ्या मांस पेशी ही मजबूत होतात त्यामुळे वय वाढत गेले तरी तुमची दृष्टी उत्तम राहते. त्यामुळे अळूची भाजी खाणे बघा किती योग्य आहे.

जर तुम्हाला सांधेदुखीचा त्रास होत असेल तर अशावेळी ही भाजी खा. यातून मिळणाऱ्या पोषण तत्वातून तुमचा आजार हळू हळू कमी होण्यास मदत होईल. या अळूच्या भाजीत मुबलक प्रमाणात फायबर असते त्यामुळे अन्न पचायला मदत होते. याशिवाय वजन कमी होण्यास ही मदत होते.

बाळंत बाईला दूध कमी येत असेल तर अशा वेळी तिने अळूची भाजी खावी. अळू हा थंड स्वभावाचा असल्यामुळे वात पित्त कफ नाशक आहे. तसेच व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी याशिवाय पोटॅशियम आणि कॅल्शिअम ही आहे. याशिवाय उच्च रक्तदाबाच्या व्यक्तीने ही भाजी नियमित खायला हवी त्यामुळे त्याचे रक्तदाब नियंत्रणात राहते.

व्हिटॅमिन सी असल्यामुळे प्रतिकार शक्ती वाढतेच याशिवाय कॅल्शिअम असते जे आपल्या हाडांच्या मजबुती साठी आवश्यक असते.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *