हेल्थ

तुरटीचे कधीही न ऐकलेले अफलातून फायदे

alum

तुरटीचे कधीही न ऐकलेले अफलातून फायदे

तुरटी तर सर्वांच्याच परिचयाची आहे तुरट चवीमुळेच तुरटी नाव प्रचलित झालं असावं, मात्र एखादे दोन फायदे सोडले तर आणखी अजून याचे किती फायदे आहेत हे तुम्हाला माहीत आहे का.? होय तुरटी अनेक प्रकारे उपयोगी आहे. म्हणजे एकापेक्षा अनेक प्रकारचे याचे उपयोग आहेत. तुरटी ही मानवाला किमान चार हजार वर्षांपासून माहिती असल्याचे पुरावे इजिप्तमध्ये आढळले आहेत. तुरटीचे अनेक आरोग्य फायदे आहे. . तुरटी चे रासायनिक नाव पोटॅशियम अल्युमिनिअम सल्फेट असं आहे.तुरटी ही मॅग्नेशियिम सल्फेट आणि केमिकल कम्पाउंडने बनलेली असते. मॅग्नेशियम ह्यूमन सेलचा एक महत्त्वपुर्ण भाग आहे. तुरटी हा पांढरा शुभ्र रासायनिक पदार्थ आहे. जे दिसायला एखाद्या खडी साखरेच्या स्पटिका प्रमाणे दिसतो. तुम्हाला दातांच्या काही समस्या असतील तर तुरटी हा त्यावर रामबाण उपचार आहे. तुम्हाला जास्त त्रास न होता तुम्ही याचा उपयोग करून घेऊ शकता.

मांसपेशी आखडण्याचा त्रास असेल तर त्यासाठीही याचा उपयोग करून घेता येतो. पोटॅशियम अलम जर तुमच्या मांसपेशी आकुंचन पावल्या असतील तर त्या बऱ्या करण्यासाठी उपयोगी ठरते. तुरटी ला रासायनिक भाषेत पोटॅशियम अल्युमिनिअम सल्फेट असे म्हणतात तुरटी ला इंग्रजीं मध्ये अलम असे म्हणतात तर हिंदी मध्ये फिटकरी असे म्हणतात. साधारण तुरट लागणारी ही तुरटी सामान्य वापरात बरीच उपयोगी असते. तुरटी चे  अनेक उपयोग आहेत. जसे की तुरटी माऊथ वोश करण्यासाठी देखील वापरली जाते. आणि खूप चांगल्या प्रकारे उपयोगी देखील ठरते. पाण्यात तुरटीचा खडा टाकून त्याने गुळण्या कराव्यात, यामुळे दातांमध्ये तयार झालेली कीड नष्ट होते, आणि हिरड्या मजबूत होतात त्या सोबतच तोंडातील दुर्गंधी नष्ट होते. त्याच बरोबर दुसरा माहीत असलेला फायदा जो की सर्वांनाच माहीत आहे तुरटीने पाणी स्वच्छ होते.

तुरटी पाण्यात फिरवल्याने सर्व गाळ खाली तळाशी जाऊन बसतो आणि पाणी स्वच्छ होते. सर्वसामान्यपणे गढूळ पाणी स्वच्छ करण्यासाठी तुरटीचा वापर केला जातो, हे आपण अगदी लहानपणापासून पाहतो. आधुनिक काळात अनेक प्युरिफायर बाजार उपलब्ध असले, तरी आजही बहुतांश ठिकाणी तुरटी गढूळ पाण्यावर रामबाण ठरत आहे. पाणी स्वच्छ करण्याची ही पद्धत फार जुन्या काळापासून वापरली जाते. तुरटी पाण्यामध्ये फिरवली असता पाण्यामध्ये असलेल्या बारीक कणांवर असलेला विद्युतभार नाहीसा होतो. त्यामुळे आधी वेगवेगळे असलेले हे कण एकत्र येतात. वस्तुमान वाढल्याने ते जड झाले की पाण्यात खाली बसतात. यामुळे पाणी स्वच्छ झालेले दिसते.

दातांच्या आरोग्यासाठी तुरटी आणि काळ्या मिर्‍याची पूड दातांवर लावल्याने दाताचे दुखणे थांबण्यास मदत मिळते. म्हणजे हा घरगुती उपाय आहे दुखणे असल्यास कधीही डॉक्टरांचा सल्ला घेणे उत्तम.  यानंतर चा येणारा तुरटीचा फायदा म्हणजे जखमेवर लावण्यासाठी. जर जखम झाली असेल आणि त्यातून रक्त वाहत असेल तर जखमेला तुरटीच्या पाण्याने धुऊन तसेच चूर्ण बनवून लावल्याने रक्त येणे थांबते. म्हणजे रक्तस्राव थांबायला मदत होते. कुठे हलकेच खरचटलं असेल किंवा शेविंग केली असेल आणि कट झालं असेल तर  शेविंग केल्यानंतर चेहर्‍यावर तुरटी लावल्याने चेहरा मऊ होतो. आणि शेविंग करताना काही कट लागले असतील तर रक्त वाहण थांबते. तुरटी ही अँटी सेफ्टिक आहे.मसल क्रॅम्प वर हळदीसह तुरटी लावणे फारच फायदेशीर आहे.

कारण तुरटीमध्ये ब्लड थिनींग घटक असतात व हळदीमध्ये अॅन्टीसेप्टीक गुणधर्म असतात यांचा चांगला फायदा होतो. त्यामुळे रक्त प्रवाह थांबायला मदत मिळते. सनबर्न झालेल्या जागी एक कप पाण्यात दोन चमचे तुरटी पावडर टाकून प्रभावित जागी लावून १० मिनिटांनी धुवून टाकावी. यामध्ये देखील तुरटी अतीशय प्रभावी आहे. रोज सकाळी तुरटीला गरम पाण्यात टाकून गुळण्या कराव्यात, त्यामुळे दाताचे किडे मरतात व तोंडाची दुर्गंधी कमी होते. त्यानंतर चा अजून एक महत्त्वाचा फायदा म्हणजे जर टॉसिलचा त्रास होत असेल तर गरम पाण्यात चुटकी भर तुरटी टाकून गुळण्या करव्यात त्यामुळे टांसिलचा त्रास हळू हळू दूर होईल. तुरटीमध्ये अस्ट्रिन्जन्ट गुण आढळतात. ज्यामुळे पिंपल्स बरे करण्यासाठी त्याचा फायदा होतो.

तुरटीच्या वापराने अलर्जीने आलेला तापही निघून जाण्यास मदत होते. तसेच खोकल्यासाठीही तुम्ही याचा उपयोग करू शकता. तुरटीचे पाणी तुम्ही पिऊन खोकला आणि दम्यावर उपाय करू शकता. तुरटीची पेस्ट तुम्ही केसांना लावली आणि नंतर केस धुतले तर तुम्हाला केसातून ऊवा काढण्यासाठी मदत मिळते. तुरटीमुळे केसातील ऊवा मरून तुमचे केस पुन्हा पहिल्यासारखे ऊवामुक्त होऊ शकतात. तुरटी मिश्रित पाण्याने रोज डोकं धुतल्याने डोक्यातील ऊवा सुध्दा मरतात.त्वचेवरील डेड स्किन काढण्यासाठी एक मोठा चमचा ऑलिव्ह ऑईलमध्ये एक चमचा तुरटी पावडर टाकून स्किनला मालिश करा.

केस घनदाट करण्यासाठी कोमट पाण्यात तुरटी आणि डीप कंडिशनर समप्रमाणात मिसळून केसांना लावावे. नंतर १५-२० मिनिटांनी थंड पाण्याने केस धुवावे. असे आठवड्यातून एकदा तरी करावे. याने केस मऊ होतात. आपणास मुत्र संसर्ग झाला असेल तर तुरटी मिश्रित पाण्याने प्राइवेट अंग स्वच्छ करावेत.तुरटी ही अँटी बॅक्टरियल सुद्धा आहे.जर तुमच्या शरीराला दुर्गध येत असेल तर त्यावर देखील तुम्ही तुरटीचा वापर करु शकता.तुटरीमुळे तुमच्या शरीरावर घामामुळे निर्माण होणारे बॅक्टेरिया नष्ट होतात व तुम्हाला ताजे वाटू लागते.तुरटी अॅन्टीबॅक्टेरियल असल्यामुळे नॅचरल डिओड्रंट म्हणून उपयोगी पडते. बाथटबमध्ये तुरटीची पावडर टाकून स्नान केल्यास हृद्यासाठी उत्तम असते.

बाथटबमध्ये तुरटीची पावडर टाकून स्नान केल्यास हृद्यासाठी उत्तम असते. तुरटी मूळे शरीराची दुर्गंधी, चेहऱ्यावरील दाग कमी होतात.जर तुमच्या त्वचेवर डाग असतील तर त्यांना दूर करण्यासाठी तुरटी हा बेस्ट ऑप्शन आहे.  त्यासाठी तुरटी बारिक करून  पाण्यात मिसळून पेस्ट तयार  करून घ्या. पाय फाटण्याची समस्या बऱ्याच जणांना असते. पण त्यावर उपाय नक्की काय करायचा. तर त्यावर तुरटी हा सोपा उपाय आहे. तुम्ही नियमितपणे तुरटीचा तुकडा पाय ओले करून त्यावर घासला तर तुमची ही समस्या लवकरच बरी होईल. तसंच तुम्हाला त्रासही होणार नाही.जर घरी आपण बटाटे वेफर्स बनवत असाल तर बटाट्याच्या स्लाइस ला आयोडीन विरहित मीठ व तुरटी टाकून थोडे गरम पाण्यात भिजवलेे असता वेफर्स चा रंग पांढरा शुभ्र होतो ते काळे पडत नाही, जर आपण आयोडीन युक्त मीठ वापरले तर बटाटे मधील स्टार्च व आयोडीन ची रासायनिक क्रिया होऊन स्लाइस गडद निळ्या रंगाच्या होतात.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *