संग्रह

कधीही न ऐकलेल्या आश्चर्यकारक आणि तुमच्या फायद्याच्या गोष्टी

आपल्याला अनेकदा बऱ्याच गोष्टी डोळ्या समोर असूनही त्याबद्दलची योग्य ती माहिती नाही त्या मागचे कारण माहीत नसते. काही अशाच गोष्टी आहेत ज्यांचा उपयोग करून तुम्ही तुमची काम समोरच्या व्यक्ती कडून करून घेऊ शकता. इतिहासात अनेक उदाहरणे सापडतील , अनेक वर्षे तप ध्यान करून लोकं सिद्धी प्राप्त करायचे, आणि त्याचाच उपयोग करून लोकांना वश करून घ्यायचे, आजच्या जमान्यात तर सिद्धी प्राप्त करणे शक्य नाही तरीही आपण काही मानसशास्त्रीय गोष्टींचा अभ्यास करून मार्ग सुकर बनवू शकतो. आता आपल्याला कसे काय हा प्रश्न पडला असेल…!! मानसशास्त्र आणि विज्ञान याच्या जोडीने हे शक्य झाले आहे. आपण यात मानवी भावभावना आणि वैचारिकता यावरून काही मजेशीर गोष्टी शिकणार आहोत. चला तर मग अशाच काही आश्चर्यकारक गोष्टी आज पाहूया ज्याचा वापर तुम्ही तुमच्या खासगी जीवनात ही हमखास करू शकता.

समोरच्या कडून त्याची खाजगी किव्वा महत्त्वाचे काही काढून घ्यायचे असल्यास – होय तुम्ही बरोबर वाचले, आपल्याला एखाद्या व्यक्ती कडून काही गोष्टी माहीत करून घ्यायच्या असल्यास काही टिप्स वापरून तुम्ही ते काम सहजरित्या करू शकता. यात आपण मानसशास्त्र आणि मानवी वर्तणूक बघू – समोरचा व्यक्ती मनात गोष्टी ठेऊन आहे आणि तुम्हाला ते जाणून घ्यायची इच्छा असल्यास, त्या व्यक्तीशी रात्रीच्या वेळी या विषयावर बोला. शक्य तेवढे भावनिक पातळीवर बोलल्यास ती व्यक्ती तुम्हाला ती गोष्ट सांगण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते.

मानसशास्त्रीय कारण-  रात्रीच्या वेळी मन हे भावनिक पातळीवर विचार करत असते. या वेळी व्यावहारिक गोष्टींपेक्षा ही भावनिक गोष्टी प्रभाव टाकतात. याचेच उदाहरण की रात्री आपण आपलं दुःख व्यक्त करत रडतो. कारण या वेळी मानसिकता भावनिक पातळीवर असते.

कोणाकडून होकार मिळवायचा असेल तर –  आपल्याला कोणाकडून एखादी गोष्ट वदवून घ्यायची असेल. किव्वा होकार मिळवायचा असेल तर काही टिप्स तुमच्यासाठी. कोणाकडून होकार मिळवायचा असेल तर सर्वात आधी त्या व्यक्तीला भावनिक पातळीवर काबुल करण्यासाठी प्रयत्न करा. उदा. सहलीसाठी परवानगी पाहिजे असल्यास. यात सरळ सरळ सहलीसाठी जाऊ का असे विचारण्या पेक्षा, आधी तुमच्या सुरक्षितते बाबत कल्पना द्या.उत्साहि वर्णन करणे टाळा. तुम्ही सुरक्षिततेच्या बाबतीत किती गंभीर आहात हे पटवून द्या.रात्रीच्या  वेळी प्रवासा बद्दल परवानगी मागू नये. बहुतेक वेळा नकार येतो. सगळ्या गोष्टी योग्य प्रमाणांत सेटल आहेत हे पाहिल्यावर समोरच्याचे मत होकारार्थी व्हायला मदत मिळते. कारण – या प्रकाणात नकार सुरक्षितते च्या दृष्टीने मिळतो. त्या विषयी विश्वास निर्माण केल्यास होकार मिळणे सोयीस्कर होते.

एखादी गोष्ट मागून घ्यायची असेल तर – तुम्हाला जर एखादी गोष्ट आपल्यासाठी मागून घ्यायची असेल किव्वा मदत मागून घ्यायची असेल तर – त्या व्यक्तीशी संवाद सुरू करताना त्यांच्याकडे एखादी मोठी गोष्ट मागावी.जी देण्यासाठी त्यांना थोडी आवघड जाईल.त्यात ते थोडे आढेवेढे घेतील.मग त्या नंतर ठीक आहे ते नको मग त्या पेक्षा छोटी गोष्ट मागावी जी देता ही येऊ शकते किव्वा नाहीही..मग त्यांनतर शेवटी आपला हुकुमाचा एक्का काढत जी हवी ती गोष्ट मागावी. दोनदा नकार देऊन पुढची व्यक्ती काहीशी खजील झालेली असते. फार मोठी गोष्ट नाही निदान ही गोष्ट तरी आपण देऊच शकतो असे तो काबुल करेल. विश्वास नाही बसत..?? प्रयत्न करून पाहा..

उदाहरण – एखाद्या कडून  500 रुपये हवे आहेत. – सर्वात आधी त्याच्याकडे 2000 मागितले. तो नकार देईल. मग 1000 आणि त्या नंतर शेवटी पाचशे रुपये चालतील असे सांगितले तर तो काबुल करेल. कारण दोनदा नाही बोलून तो खजील झालेला असेल. शेवटी तुम्ही कमीची मागणी केल्यावर तो ही आपल्या परीने मदत करण्यासाठी विचार करेल. आणि तुम्हाला देवूनही टाकेल.

समोरच्या व्यक्तीच्या मनात विश्वास निर्माण करण्याचा असेल तर – समोरच्याच्या मनात आपल्या बद्दल विश्वास निर्माण करायचा असेल तर, तो सांगून निर्माण होत नसतो, आपल्या वर्तनातून तो निर्माण होत असतो. त्यासाठी काहीही झाले तर समोरच्याची मर्जी राखण्यासाठी प्रयत्न करा. तुम्ही त्यांच्या मनासारखे वागताना पाहून त्याना तुमच्यावर विश्वास बसेल. दिलेला शब्द कोणत्याही परिस्थितीत पाळा. आणि आपल्या मतावर ठाम राहा याने विश्वास निर्माण व्हायला मदत मिळते.

 नकार होकारात बदलायचा असेल तर –   नकार जर होकारात बदलायचा असेल तर सर्वात आधी विरोध करणे टाळा. समोरच्याला ओपलं मत बदलायला सांगितलं तर तो नक्कीच ऐकणार नाही. म्हणून आधी तर त्यांच्या नाकारणे होणारे तोटे लक्षात आणून द्या. त्यांचे त्यांच्या दृष्टीने कसे बरोबर आहे हे सांगा सोबत तुमची बाजू ही पटवून द्या.त्याने मन हळूहळू होकारार्थी विचार करेल. मग संभाव्य फायदे सांगितल्यास होकार येण्याची शक्यता वाढेल.

मनावरचा अतिरिक्त ताण कमी करायचा असेल –  मनावरचा अतिरिक्त ताण कमी करायचा असेल तर सर्वात आधी तर विचार करणे थांबवणे गरजेचे असेल. मोकळा वेळ असेल तर मनोरंजक गोष्टी करा, गाणे ऐकणे, डान्स करणे किव्वा स्वयंपाक अशा आपल्या अवडीच्या गोष्टी करणे. आणि आपल्या जवळच्या व्यक्ती शी फोन करून गप्पा ही मारू शकता याने मनावरचा अतिरिक्त ताण नक्कीच कमी होईल. या काळात मनात गोष्टी साठू देऊ नका सतत बोलत रहा. शांत बसने टाळा, ऍक्टिव्ह राहा याने हृदयविकार होण्याचा धोका कमी होतो.

वाद कमी करायचे असेल तर – कुटुंबातील व्यक्तींशी किव्वा आपल्या जोडीदाराशी आपले कुठल्या ना कुठल्या कारणा वरून वाद होत असतात. जर मनापासून हे वाद कमी करण्याची इच्छा असेल तर.. खालील गोष्टी पाळा.

  • जेव्हा कधी राग येईल तेव्हा उत्तर देणे टाळा.
  • समोरचा रागात असेल तर त्याच्या गोष्टी मनावर घेऊ नका.
  • समोरचा रागात असेल तर त्याच्या गोष्टी मनावर घेऊ नका.
  • काही कारणाने वाद झालाच तर समोरच्या च्या असं वागण्याचे कारण शोधन्याचा प्रयत्न करा.
  • वेळोवेळी त्यांच्या कामाबद्दल प्रेम आणि जिव्हाळा व्यक्त करत त्यांच्यावरचा विश्वास किती दृढ आहे हे दाखवून देत जा.

बाहेर किव्वा कामाच्या ठीकाणी शायनेस कमी  करायचा असेल तर –  बऱ्याचदा अस होत पण कॉलेजमध्ये बाहेर किव्वा कामाच्या ठिकाणी एक ठराविक छबी घेऊन आपली ओळख निर्मान केलेली असते. जसे रोज रोज जिन्स घालणारा मुलगा फॉर्मल मध्ये दिसला तर लोकांना आश्चर्य होईल म्हणून नेहमी लाजूनबुजून राहणे.हे जर कमी करायचे असेल तर,खालील गोष्टी पाळा.

  • रोज टापटीप आणि स्वच्छ कपड्यांचा वापर करा. याने तुमचा आत्मविश्वास वाढेल.
  • योग्य वेळी योग्य प्रतिउत्तर द्यायला शिका.
  • आपल्या व्याक्तीमत्वाचे वेगवेगळे पैलू दाखवत चला. एकाच पध्दतीने छबी निर्माण झाल्यास नवीन गोष्टी करताना संकोच निर्माण होतो.
  • काही शंका असल्यास बिनधास्त विचारून बघा. कामात शंका न विचारल्याने संकोचिंत वृत्ती वाढत जाते.

या गोष्टींचा नक्कीच तुम्हाला तुमच्या वयक्तिक जीवनात फायदा होईल.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *