विचारधारा

ऐकावे ते नवलंच, हा प्राणी आपला रोष व्यक्त करण्यासाठी चक्क तुमच्यावर थुंकतो

आता पर्यंत अनेक कथा तुम्ही ऐकल्या असतील. प्राण्यांविषयी अनेक दंतकथाही तुम्हाला माहीत असतील मात्र एक प्राणी असा आहे जो चक्क तुमच्या अंगावर थुंकतो. पण त्यासाठी फक्त त्याला राग आला पाहिजे. म्हणजे गमंत म्हणून मात्र काही करायला जाऊ नका नाहितर उगाच महागात पडेल. कारण हा प्राणी चावाही असा कडकडीत घेतो ज्याने कित्येकांना आपले हात गमवावे लागले आहेत. हा प्राणी म्हणजेच आपले उंट काका…!! म्हणजे गमंत म्हणून करायला जाऊ नका , उंटाला जर एखाद्या माणसाचा राग आला तर तो त्या माणसावर थुंकतो, हो थुंकणे म्हणजे माणसांसाठी एक प्रकारचा अपमान असतो.

मात्र आवडले नाही किंवा गोष्टींचा राग आला म्हणून उंट चक्क माणसांसारखाच त्या व्यक्तीच्या अंगावर थुंकत आपला राग व्यक्त करतो. हो. हे खरे आहे!! पण, म्हणून इतकेच सत्य समजण्याची चूक करू नका…! कारण, उंटाला जेव्हा राग येतो तेव्हा मनुष्यावर थुंकण्याऐवजी कडकडून चावा घेण्यावर उंटाचा अधिक विश्वास असतो. त्या वेळी त्याचा आक्रमक पवित्रा जास्त असतो ज्याने समोरच्याला त्याच क्षणी अद्दल घडेल. तसा हा शांत प्राणी आहे दिसायला जरी काहीसा भीतीदायक दिसत असला तरीही या प्राण्याला घाबरण्याचे कारण नाही पण तुम्ही स्वतःहून जर त्याचा वाटेला गेलात मग मात्र तुमची खैर नाही. चारा खाताना डिवचल्यास उंट थुंकण्याचा प्रयत्न करतो.

म्हणजे त्याचा तो प्रत्यक्षात रागच असेल असं काही नाही असे करणे म्हणजे आपले वागणे त्याला आवडले नाही असे दाखवणे असू शकते. आपल्याकडे राजस्थान मध्ये उंट पालन केले जाते. आणि बाकी राज्यांतही काही प्रमाणात हे पाळले जातात. मात्र इराणी देशांमध्ये उंटांचा मोठा व्यवहार चालतो. उंट विषारी नसल्याने तो अंगावर थुंकला तरी घाबरण्याचे कारण नाही. त्याच्या थुंकीने तुम्हाला काही त्रास वैगरे होणार नाही मात्र अंगावर चांगला मोठ्या थुंकीचा थर उडल्यावर उलटी सारखे मात्र नक्की होईल.  उंट नेहमीच राग आल्यावर मनुष्यावर थुंकत नाही, तो समोरच्या गोष्टीला नापसंती दर्शवताना असे वागू शकतो, हे ध्यानात असू द्यावे…

उंट एक उपयोगी प्राणी आहे. उंटाचे दूध जवळपास तीन हजार रुपये लिटर या भावाने विकले जाते. परंतु, एक गोष्ट लक्षात घ्यावी , उंट जेव्हा चावतो की तसा प्रयत्न करतो तेव्हा मात्र तो खरंच रंगवलेला असू शकतो. तेव्हा त्या काळात त्याच्या पासून लांब राहणेच योग्य. उंटाचे चावणे मात्र खूपच जिव्हारी लागते. उंट चावल्याने आजपर्यंत अनेकांना आपल्या हाताची हाडे मोडून घ्यावी लागली आहेत. त्याचा चावा एकटा कडकडीत असतो की तुम्हाला प्रतिकार करायला वेळच मिळणार नाही. मुळात चावा घेणे म्हणजे उंटाच्या एकंदरीत सर्व शरीर रचना पाहता सोयीस्कर ठरते, करणं हा एक शांत प्राणी असल्याने त्याला राग खुप कमी येतो. त्यात वाळवंटात चालण्यासाठी कडकडीत उंच आणि  लांबसडक पाय आणि मान गुळगुळीत डोके यांमध्ये त्याच्या संकट समयी प्रतिकार करण्यासाठी दुसरा कोणताच पर्यंय उपलब्ध नसतो.

परिणामी तो चावा घेतो, हीच त्यांची प्रतिकार करण्याची पद्धत आणि स्वतःचे शस्त्र. उंट माजावर आला असल्यास त्याच्या वाट्याला जाऊ नये. माजावर म्हणजे उंटांचा समागणाचा काळ जवळ आला असेल तर तो जास्त उत्साहित आणि उत्स्फूर्तपणे काहीतरी करून बसतो. त्यामुळे समोर माणूस जरी आला तरी इजा पोहचवू शकतो. या बाबतीत फक्त उंटच नाही तर बाकी प्राणी ही आक्रमक असतात. जसे शेळी, गायी, कुत्रा, मांजर, यांसारख्या प्राण्यांच्या वागण्यात तुम्हाला बदल जाणवेल. त्या काळात जे आक्रमक होऊ शकतात. तसेही महाराष्ट्राच्या दृष्टीने हा प्राणी दुर्मिळ आहे. शेळ्या मेंढ्यांसारखा तो मात्र सगळीकडे पाळला जात नाही. जगात  वाळवंटीय देशांमध्ये उंटांचा वापर प्रामुख्याने केला जातो.

जगात अनेक रंग व आकाराचे उंट आढळतात. परंतु, उंटाच्या प्रमुख दोनच प्रजाती आहेत. त्यात जनुकीय बदल होत होता वेगवेगळ्या आकारातले उंट जन्म घेऊ लागले आहेत.  उंटाला आजचे वैभव प्राप्त करण्यासाठी लाखो वर्षांच्या प्रक्रियेतून जावे लागले आहे. त्यामुळेच जगात अगदी शेळीच्या आकाराचेही उंट आढळतात! प्रत्येक जीवाची आपापल्या परीने जगण्याची धडपड चालू असते. मात्र उंट हा प्राणी अनेक वर्षांपासून तग धरून आहे. अगदी वातावरणात जुळवून घेत असताना जनुकीय बदल झाल्याने जगात शेळीच्या आकारात देखील तुम्हाला उंट सापडतील. माणसाच्या शरीरातील थोडे जरी पाणी कमी झाले तरी डिहायड्रेशनसारख्या समस्येला बळी पडावे लागते. तसेच काही बाकी प्राण्यांच्या बाबतीत ही आहे मात्र उंटाच्या बाबतीत काहीसे वेगळे गणित आहे.

याच्या शरीरातील पाणी 25 टक्के कमी झाले तरी उंटाला फरक पडत नाही. कारण, उंट हा प्रामुख्याने वाळवंटात राहणारा प्राणी असल्याने ही क्षमता त्याने प्राप्त केली आहे. त्या वातावरणात राहण्यासाठी तग धरण्यासाठी त्याने स्वतःत ते बदल करून घेतले आहे.  उंट तब्बल 20 दिवस पाणी न पिता सहजच जगू शकतो. त्यात गमंत म्हणजे एकावेळी 100 लिटरपेक्षाही अधिक पाणी पिण्याची क्षमता या प्राण्याने विकसित केली आहे.त्यामुळे अधिक अधिक पाणी पिऊन ते आपल्या पेशीमध्ये साठवून ठेवणे आणि वेळेनुसार त्याचा उपयोग करणे ही ही कला उंटाकडे आहे.  जठरातील वैशिष्ट्यपूर्ण पेशींमुळे उंट शरीरात पाणी साठवू शकतो. शिवाय घामाच्या माध्यमातून पाण्याचे उत्सर्जन होत नाही.त्यामुळे वाळवंटात कधी पाण्याविना माणसाचा जीव जाण्याची वेळ आली तर उंटाच्या पोंटातून पाणी काढून पिल्याची देखील अनेक उदाहरणे आहेत.

उंट एक उपयोगी प्राणी असला तरी बुद्धीने तो मंदच समजला जातो. त्याचा काहीसा संबंध गाढव कॅटेगरीशी लावला जातो. फारसा विचार प्राणी नसल्याने ओझे वाहने तेव्हडे काम तो नेटाने करतो. त्या तुलनेत कुत्रा अतीशय हुशार आणि चपळ प्राणी आहे. मात्र,उंट नेहमीच सहन करत बसत नाही प्रसंगी तो चावतो आणि थुंकतोही, ह्या बाबी त्याला विशेष दर्जा मिळवून देण्यासाठी पुरेशा आहेत. शिवाय सोन्याच्या भावात भाव मिळणारे त्याचे दूध मानवाच्या शरीरासाठी अत्यंत चांगले आहे. अनके प्रकारचे आजार त्यामुळे नष्ट होत असल्याने उंटाच्या दुधाला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. महागडे असूनही लोक मजेने हे दूध पिणे पसंत करतात.लोकर, उंटाची कातडी, दात यांसारख्या अवयवांची तस्करी केली जाते.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *