मनोरंजन

कारभारी लय भारी मालिकेतील अनुष्का सरकटे ही याधीही दिसली होती या मालिकेत

काही दिवस लॉक डाऊन नंतर जोमात सीरिअलचे शुट्टींग चालू आहे आणि आता तर सगळ्या चॅनलने नवीन नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या आहेत. या मालिका खूप वेगळ्या आहे त्यांचे विषय वेगळे आहेतच शिवाय त्यातील बहुतेक कलाकार हे सुधा नव्याने आपल्या भेटीला येणार आहेत.

सध्या नव्याने येणारी मालिका म्हणजे कारभारी लयभारी ही मालिका झी मराठी या चॅनलवर सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7.30 वाजता आपल्या भेटीला येत आहे. या मालिकेचा प्रोमो पाहून तिच्यातील उस्तुकाता अधिक वाढली आहे. या मालिकेत मुख्य भूमिकेत असणाऱ्या कलाकाराची सोबत घेऊन येणारी कलाकार म्हणजे अनुष्का सरकटे ही तुम्हाला वाटेल नवोदित कलाकार आहे. पण तसे मुळीच नाही. ह्या अभिनेत्रीने लक्ष्मी नारायण या मालिकेत लक्ष्मी देवीची भूमिका केली होती. ही मालिका कलर्स मराठी या चॅनलवर प्रचंड लोकप्रिय होती.

आता सध्या ती झी मराठी वर नवीन मालिका मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. बघुया ती या मालिकेत तिची भूमिका किती उठावदार पणे मांडत आहे. अनुष्का सरकटे हिला पहिल्यापासूनच अभिनयाची आवड आहे. तर बघुया ही मालिका कुठपर्यंत प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान कायम करते.

कारभारी लय भारी मालिकेत अनुष्का सोबत निखिल चव्हाण सुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ह्या आधीही आपण त्याला झी मराठीवर पाहिले आहे. एक तिसरा चेहरा सुद्धा ह्या मालिकेत आपल्याला पाहायला मिळेल. ह्या पात्राची ओळख समोर आली नाहीये पण हे महिला पात्र सुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहे. प्रोमो मध्ये आपण तिची एक झलक पाहिली आहे.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *