सध्या झी मराठी वरील लोकप्रिय असलेली मालिका म्हणजे येऊ कशी कशी मी नांदायला यातील सर्वच कलाकार उत्तम काम करत आहेत पण आपण आज पाहणार आहोत ते म्हणजे मुख्य भूमिकेत असणारी स्वीटू हिच्या बद्दल तुम्हाला ही माहित नसणाऱ्या गोष्टी. तिचा जन्म ठाण्यात झाला आहे.
स्वीटू हीचे खरे नाव आहे अनविता फलटणकर. या मालिकेत तिने एका मध्यम वर्गीय मुलीची भूमिका करत आहे. तिच्या स्वभावात असणारा समजूतदार पणा आपल्याला दिसून येते.
तिचा पहिला चित्रपट म्हणजे टाईमपास यातून ती आपल्याला दिसली होती. यात ती केतकीच्या मैत्रिणीची भूमिका साकारताना दिसून आली. याशिवाय ती गर्ल्स या मराठी चित्रपट मधे ही दिसून आली होती. तिने अभिनयाचे शिक्षण घेतले आहे. व्हाय सो गंभीर, तिची सतरा प्रकरण या नाटकामध्ये ही आपल्याला दिसलेली आहे.
यु टर्न ही व्हेब सिरीज ही तिची आली होती. तसेच सोनी मराठी वरील कॉमेडीची हास्य जत्रा यामधे ती सहभागी झालेली. आणि सध्या चालू असलेली येऊ कशी कशी मी नांदायला ही मालिका करत आहे पहिल्यांदाच ती मुख्य भूमिकेत दिसून आली आहे बघुया प्रेक्षकांच्या किती पसंतीस उतरते.
स्टार प्रवाह वरील लती आणि झी मराठी वरील स्विटू ह्या दोघांची नेहमी अभिनयात तुलना केली जातेय. तुम्हाला ह्या दोघींमधून कोण आवडतं आम्हाला नक्की कळवा.
लती is बेटर