विचारधारा

भावनिक दृष्ट्या आपण खरच भक्कम आहोत का?

खूप वेळा असे होते की, आपण उगाच सगळ्या गोष्टींचा विचार करत बसतो. असे वागले तर कोणाला कसे वाटेल? ती व्यक्ती आपल्या बद्दल काय विचार करेल? अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण आपल्या भावना मनातल्या मनात कोंडून ठेवतो त्यांना बाहेर येऊच देत नाही.

यामुळे होते काय की, आपण आपल्या भावना लपवणे जास्त सोयीचे मानायला लागतो. ही गोष्ट इतरांच्या दृष्टीने क्षुल्लक असेल, मात्र असे करून आपण आपल्यावरच खूप मोठा गुन्हा करत असतो. पण जर तुम्ही असे करत नसाल तर मात्र तुमच्याहून भक्कम कोणीच नाही.

जर तुम्ही खुलून हसू शकता आणि तेवढ्याच खुलेपणाने रडू शकता तर, तुम्ही कमकुवत किंव्हा दुबळे नाही तुम्ही खूप भक्कम आहात. खूप वेळा असा गैरसमज होतो, की रडणारे लोक हे कमजोर असतात पण तसे नाहीये, जे लोक उघडपणे रडू आणि हसू शकतात तेच खरे भावनिक दृष्ट्या भक्कम असतात.

ज्यांना खरच त्यांची किंमत कळत असते, दुसऱ्यांच्या आयुष्यातली स्वतःची त्यांना ठाऊक असते, की जिथे आपल्याला योग्य वागणूक मिळत नाही तिथे थांबणे देखिल योग्य नाही. आणि वेळीच अशा लोकांच्या आयुष्यात निघून जायला हवे.

आयुष्यात चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही गोष्टी घडतच असतात आणि पुढेही घडतील, मात्र त्यातून आपल्याला जो धडा शिकायला मिळतो तो शिकून पुढे जायला हवे. हे ज्या व्यक्तीला कळते आणि जेव्हा तो त्याप्रमाणे वागतो त्याला कोणीच आणि कोणतीच परिस्थिती अडवू शकत नाही.

आजकालच्या जगात मानसिक दृष्ट्या भक्कम असणे सगळ्यात जास्त गरजेचे आहे. जर तसे होता येत नसेल तर हळू हळू शिकून घ्या, कारण आपले मन जेव्हा शांत असते तेव्हाच आपण खरे समाधानी असतो.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *