Uncategorized

अरुण कदम ह्यांच्या वयक्तिक आयुष्याबद्दल

Arun kadam biography

कॉमेडी शो पाहून आपण आपला दिवसभराचा सर्व थकवा विसरून जातो. म्हणून अशा शो ना नेहमीच लोकांची पसंती असते. ह्यात अनेक हिंदी मराठी शो असे आहेत ज्यांचा समावेश आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात केला आहे. तुम्हीही असे तुमच्या आवडीचे शो नक्कीच पाहत असणार ह्यात काही शंका नाही.

Source Arun kadam social handle

तुमच्या आवडीचा मराठी कॉमेडी शो कोणता असा प्रश्न सध्या महाराष्टातील जनतेला विचारला तर ८० टक्के लोकांचे मत सोनी वाहिनीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा हाच असेल. सध्या हा शो एवढा तुफान गाजत आहे की लोक सहकुटुंब पाहू लागले आहेत. ह्यामध्ये असणारे सर्वच कलाकार जीव ओतून काम करत आहेत. आता ह्या शो ची वेळ बदलली असून रविवारी ८ ते १० वाजता शो टेलिकास्ट होतो.

इथे कुणा ऐकाचे नाव घेऊन आपण दुसऱ्याला कमी लेखू शकत नाही. पण एवढे सर्व असून आपल्याला ह्या कलाकारांच्या वयक्तिक आयुष्याबद्दल खूप कमी माहीत आहे. म्हणून आमचा नेहमीच हा उद्देश असतो की ह्या कलाकारांच्या आयुष्याबद्दल तुम्हाला देखील कळले पाहिजे म्हणून आम्ही महाराष्ट्राच्या हास्यजत्रा शो मधील सर्वाबद्दल लिहून ठेवलं आहे तुम्ही आमच्या इतर आर्टिकल मध्ये जाऊन वाचू शकता.

आज आम्ही द अरुण कदम सर ह्यांच्या बद्दल आणि त्यांच्या वयक्तिक आयुष्याबद्दल सांगणार आहोत. अरुण कदम सर हे बऱ्याच वर्षांपासून असे कॉमेडी शो करत आले आहेत. आगरी भाषेवर त्यांचे प्रभुत्व आहे म्हणून त्यांच्या तोंडून आगरी भाषा ऐकायला जाम भारी वाटतेय बोल. त्यांनी अनेक मराठी सिनेमा आणि मराठी मालिकांमध्ये सुद्धा कामे केली आहेत. ओवाळते भाऊराया, घंटा, जलसा, शिनमा, जस्ट गम्मत, सासूबाई गेल्या चोरीला, टाटा बिर्ला आणि लैला, थोरली बहीण अशा अनेक मराठी सिनेमात त्यांनी उत्तम अभिनय केला आहे.

एवढेच काय तर अरुण सरानी हिंदी सिनेमातही कामे केली आहेत हे खूप कमी लोकांना माहीत आहे. २००९ मध्ये आलेला बायपास, २०११ मध्ये आलेला दिल तो बच्चा है जी, २०१२ मध्ये आलेला हृदयनाथ आणि सनी देओलचा काफिला सिनेमात सुद्धा त्यांनी काम केलं आहे. अनेक वर्ष ते ह्या इंडस्ट्री मध्ये आपला एक वेगळा ठसा उमटवून आहेत.

Source Arun kadam social handle

त्यांच्या वयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झालं तर त्यांच्या मागे त्यांची बायको आणि मुलगी आहे असा छोटासा पण सुखी परिवार आहे. त्यांच्या बायकोचे नाव वैशाली कदम आणि मुलीचे नाव सुकू आहे. मुलगी २३ वर्षाची आहे. नेहमीच ते आपल्या कुटुंबासोबत सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यांचे अनेक फोटो आपण सोशल मीडिया मार्फत पाहू शकतो.

महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील ह्या कलाकारांच्या वयक्तिक आयुष्याबद्दल सुद्धा वाचा.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *