“आई कुठे काय करते” या ही मालिका आता वेगळ्या वळणावर येऊन ठेपली आहे. जसं प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेम हे एक वेगळे वळण देऊन जाते तसेच काहीसे अरुंधती आणि अशितोषच्या बाबतीत झालेले आहे. जेव्हा अभी अरुंधतीच्या घरी येऊन तिला अशितोष बद्दल सूनाऊन जातो ते पाहून आशितोषला राहवत नाही आणि तो त्याचा जाब विचारायला अनिरुद्ध आणि त्याच्या कुटुंबाकडे जातो.
तेव्हा आशुतोष आणि अनिरुद्ध या दोघांमध्ये बाचाबाची होते तेव्हा आशुतोष अरुंधतीवर असलेले त्याचे प्रेम सांगतो पण तरीही “माझे अरुंधतीवर प्रेम आहे पण अरुंधतीचे फक्त अनिरुद्धवर प्रेम होते तिच्या मनात मी कुठेही नाही असेही तो सांगतो”.
हे सगळं बोलत असताना अरुंधती आणि यश दरवाजा मागे उभे राहून ऐकत असते. त्यानंतर अरुंधती आणि यश या विषयावर बोलताना दिसतात तिच्या मनात कुठेही आशुतोष नाही.
अनिरुद्ध इतक्या खालच्या पातळीला जाऊन अरुंधतीला बोलत असतो ना कधी तो चांगला नवरा झाला तरीही त्याच्यावर प्रेम करणे म्हणजे एखाद्या दगडावर प्रेम करणे हे अरुंधतीला कसे कळत नाही आणि अरुंधती ने काय करायचे काय नाही करायचे हे अनिरुद्ध ला विचारायचा आता तरी काहीच अधिकार नाही हे लेखकाला ही कळायला हवे.
जरी ही मालिका चाहत्यांना आवडत असली तरी काही चाहते ह्या मालिकेला ट्रोल करताना दिसत आहेत. कारण मालिकेत असे काही दाखवले जाते जे चाहत्यांच्या मनाविरुद्ध असते. आपले मन आशुतोष अरुंधती समोर सुद्धा व्यक्त केलं पण अरुंधती या नात्याला फक्त मैत्रीच नाव देईल. पण पुढे जाऊन काहीच दिवसात तुम्हाला हा दोघांमध्ये एक नवीन नात्याची सुरुवात पाहायला मिळणार आहे. बघुया यापुढे काय पाहायला मिळणार आहे या मालिकेत.