मनोरंजन

आई कुठे काय करते मधील अनघाचा अभी नाही तर हा आहे खरा आयुष्यातील नवरा

आई कुठे काय करते या मालिकेतील प्रत्येक पात्र हे प्रेक्षकांच्या जवळचे आहे. त्यातील एक पात्र म्हणजे अनघा अरुंधतीची सून ही सुध्दा प्रेक्षकांना खूप आवडते. तिची भूमिका या मालिकेतील एक उत्तम सून म्हणून आहे. त्या घरात मोठा मुलगा अभी याच्यासोबत अनघाचे लग्न झाल्यामुळे ती त्या घरात जोडली गेली. पण तिच्या खऱ्या आयुष्यातील अभी तुम्ही पहिला आहे का?

Source ashvini mahangade social handle

अनघा म्हणजे अश्विनी महागंडे हिने सध्याचं आपल्या होणाऱ्या नवऱ्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून तिच्या आयुष्यातील खऱ्या नवऱ्याची ओळख करून दिली आहे. तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव आहे निलेश जगदाळे यांचा फोटो तिने काही दिवसांपूर्वीच त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अश्विनी हिने टाकलेल्या फोटो मुळे आणि त्या सोबत तिने काही वाक्य शेअर केली यामुळे चाहत्यांना या दोघांत काहीतरी वेगळं नातं आहे हे कळलं. त्यामुळे खर तर या दोघांचा साखरपुडा झाला आहे की काय अशा ही कमेंट केल्या आहेत. अश्विनी हिने चालवत असलेल्या सामाजिक संस्थेची जबाबदारी निलेश यांनी सुद्धा घेतली आहे.

आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणात आपला जोडीदार सहभागी असावा असे प्रत्येक स्त्रीला वाटत असते तसाच असावा आश्र्विनीचा हा जोडीदार. पण आता चाहते खरी वाट पाहत आहेत ती म्हणजे या दोघांचे लग्न कधी होणार आहे.

Source ashvini mahangade social handle

अनघाने आतापर्यंत ‘आई कुठे काय करते’ मधील सून “अनघा” त्या अगोदर आधी अश्विनीने ‘स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजीराजे’ मालिकेत त्यानंतर ती ‘राणू आक्कासाहेब’ या भूमिकेत होती. ही भूमिका प्रेक्षक पण अनघा ही जशी पडद्यावर आपल्याला एक उत्तम सून म्हणून पाहायला मिळते त्यापेक्षा जास्त ती चांगले कार्य बाहेरच्या जगात ही करत आहे तिने ‘रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान’ ची स्थापना केली आहे त्यातून ती विविध गरजू लोकांची मदत करत आहे. कोरोना काळातही या अभिनेत्रीने रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना अन्न पुरविण्याचे काम केले आहे.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *