हेल्थ

दमा होण्याची कारणे आणि घरगुती उपचार…!

Asthma Home Remedies

सध्याची जीवनपध्दती पाहता, आपण आरामात जीवन जगत अनेक विकारांना आणि आजारांना आमंत्रणं देत आहोत, अनेक आजार अगदी तरुणवयात होताना दिसतात. सध्याची अशीच एक वाढती समस्या सतत खोकला येणे दम लागणे म्हणजेच दमा  उदभवताना दिसत आहे. दमा हा एक तीव्र स्वरुपाचा आजार असून तो आपल्या श्वसनमार्गांवर परिणाम करतो. दमा असलेल्या लोकांना सामान्यपणें श्वसनहीनता, श्वास गमावल्यासारखे किंवा कोंडल्यासारखे जाणवणें अनुभवायला मिळते, जे विशेषकरून दमा उभारीला आल्यावर होते. दमा होण्याची नेमकी कारणं कोणती, आणि आपण कोणती काळजी घेतली तर यावर मात करू शकू याबद्दलची माहिती आपण या सदरात पाहणार आहोत.

दमा हा पूर्णतः बरा करता येत नाही, परंतु दमा असलेले बहुतांश लोक त्याला नियंत्रणात ठेवू शकतात जेणेकरुन त्यांना थोडी आणि कमी वारंवारतेनं लक्षणं उद्भवतात आणि ते क्रियाशील जीवन जगू शकतात. फुफुसंच्या वाढलेल्या संवेदनशीलतेला दमा असे म्हणतात. दम्याच्या त्रासात सतत खोखला येणे व धाप येणे ही मुख्य लक्षणे दिसतात.दमा पूर्णपणे बरा तर होत नाही मात्र नियंत्रित करता येऊ शकतो, कारण नियमित व्यायाम योग्य आहार आणि योग्य ती काळजी घेतल्याने दमा नियंत्रित करता येऊ शकतो.श्वसनमार्ग म्हणजे त्या नळ्या असतात ज्या तुमच्या फुफ्फुसातून हवा आत-बाहेर नेण्याचं काम करतात. अरुंद हवेच्या वाटांनी हवेच्या प्रवाहाला प्रतिरोध झाल्यामुले एक उंच पट्टीचा आवाज निर्माण होतो.

सौम्य प्रकारच्या दम्यामध्ये, व्यक्तीने श्वास सोडल्यास शिटीचा आवाज येतो.दम्यामध्ये कोरडा खोकला, तसेच श्‍वास घेताना छातीमध्ये घरघर ऐकू येणे व कफ होणे ही प्राथमिक लक्षणे आढळून येतात. तीव्र प्रकारच्या दम्यामध्ये, व्यक्तीने श्वास घेतल्यासही शिटीचा आवाज येतो.आपल्याला दमाविकार असेल तर आपल्या श्वसनमार्गांच्या आतील भिंतींला सूज येते त्यामुळे आग होते दम लागतो यामुळेच दमा उदभवतो.दमा होण्याची कारणे पाहू,

दमा होण्याची कारणे – खाली दिलेल्या काही कारणांनी दमा उद्भवू शकतो – १ – धुळीच्या अल्लेर्जीचे रूपांतर देखील दम्यात होऊ शकते म्हणून त्यावर उपाचर आणि योग्य ती काळजी घेतली गेली पाहिजे. अतिसूक्ष्म धुळीचे कण याने शिंका येणं सतत धाप लागणे हे त्रास दिसतात. धुळीमुळे धाप लागते, आणि स्वास घ्यायला देखील त्रास होतो. २- आनुवंशिकता – अनुवांशिकता म्हणजेच आईवडील यांच्यापैकी कोणाला जर हा त्रास असेल तर तो आपत्यांना अद्भुऊ शकतो. सोबतच कधीकधी आईवडिलांना नसेल आणि आजी आजोबांना असेल तरीही मुलांना हा त्रास आनुवंशिकतेने जाणवू शकतो.

३ – लहान मुलांना दूध ,अंडे , धूलिकण, विशिष्ट पदार्थ यांसारख्या गोष्टींनी ऍलर्जी उद्भवू शकते.यातूनच हळूहळू दम्याचा त्रास उद्भवण्याचा धोका असतो. ४ – तंबाखूजन्य पदार्थ, सिगारेट,अमली पदार्थांच्या धुराने देखील दम्याचा त्रास उद्भवू शकतो.त्यामुळे दम्याचा त्रास असलेल्या व्यक्तिंनी विशेषतः अशा पदार्थांचे सेवन टाळावे. ५ – लहान मुलांच्या जन्माच्या वेळी बाळाचे वजन कमी असणे,श्वसनमार्गात जंतुसंसर्ग होणे यांसारख्या कारणांमुळेही दमा होऊ शकतो. ६ – वातारणातील थंडपणा आणि कोरडेपणा दमटपणा यामुळे देखील त्रास उद्भवू शकतो.ववातावरणात झालेले बदल शरीरावर परिणाम करतात, दम्याच्या रुग्णांना याचा विशेष त्रास होतो, वातावरणान बदलले की त्रास ही वाढतो.

७ – याचबरोबर आजच्या स्थितीत आपले जीवनमान आणि वाढते प्रदूषण यामुळे देखील अनेक आजार उदभवत आहेत. शहरीकरण विशेषतः जास्त प्रमाणात होत असल्याने प्रदूषणाचा आपल्यावर परिणाम होत आहे. ८- वाढते वजन लठ्ठपणा यामुळे देखील दमा उद्भवू शकतो. वजन वाढल्याने शरीराच्या फिटनेस कडे लक्ष न दिल्याने धाप लागून चरबी साठते त्यामुळे दम लागण्याची समस्या उद्भवू शकते. ९ – याचबरोबर झुरळे ,कीटक, आणि गवतांचे परागकण, बुरशी जी घरात असेल किव्वा बाहेर सिगारेटचा धूर, हवेचे प्रदूषण, थंड हवा किंवा हवामानातील बदल, रंगकाम किंवा स्वयंपाकामुळं निघणारे तीव्र वास, सुगंधी उत्पादने ( परफ्युम, पावडर, आणखी सौदर्य प्रसादने. तीव्र स्वरुपाचे भावनिक प्रदर्शन (रडणे किंवा जोरात हसणे) आणि तणाव, अस्पिरीन किंवा बीटा-ब्लॉकर्ससारखी औषधे, अन्नातील सल्फाईटस् (सुकामेवा) किंवा शीतपेये यांच्यामुळे देखील हा त्रास उद्भवू शकतो.

१० – दमा आजतोगायत एक असाध्य आजार आहे आणि रुणांमध्ये अस्वस्थतेचे प्रमुख कारण आहे, कारण त्यांना अनियमितपणें श्वासहीनतेचे झटके येतात आणि छातीमधे घट्टपणा आणि श्वासाच्या कोंडीची त्रासदायक लक्षणे अनुभवावी लागतात. हे झाले दमा उदभवण्याची कारणे आता आपण यावर उपाय आणि रोजनिशी मध्ये घ्यायची काळजी कशी असावी हे पाहू, खाली काही घरगुती उपाय ही दिले आहेत ते करून रुग्णाला तात्पुरता अराम मिळू शकतो, मात्र तसा जास्तीचा त्रास उदभवल्यास कधीही डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.

उपाय आणि घ्यावयाची काळजी – १-  धुळीचे मार्ग टाळावेत, जास्त प्रमाणात धूळ असेल ते ठिकाण टाळावे शक्यतो तोंडाला रुमाल अथवा मास्क लावावा याने नाका तोंडात धूळ जाऊन धाप कमी लागण्यास मदत होते. २ –  अंघोळीच्या आधी छातीला तिळतेलाने मालिश करावे. त्यामुळे छातीला आलेली सूज कमी होऊन धाप लागणे व छातीचा दाह होणे यावर नियंत्रण येईल. ३-  नियमितपणे ३० मिनिटं व्यायाम कारावा, असे केल्यास दमा कमी होऊ शकतो. नियमित व्यायामने आपण दम्याला नियंत्रित ठेऊ शकतो. ४ – कांद्याचा रस, आल्याचा रस, तुळशीची पाने आणि मध यांच्या सेवनाने दमा नष्ट होऊ शकतो. त्यामुळे आहारात या गोष्टींचा समावेश अवश्य करावा. ५ – जर तुम्हाला नैसर्गिक पदधतीने तुमचा दमा बरा करायचा असेल तर आहारात प्रोबायोटीक्स वाढवा.

आपल्या आहारामध्ये दही, ताक आणि चीज सारखे पदार्थ अवश्य समाविष्ट करा. हे सर्व प्रो-बायोटिक्स आहेत. यांच्या सेवनाने शरीराची रोगप्रतिकारशक्ती बळकट होयास मदत होते.यासाठी आहारात योगर्ट,मिसो,फरमंटेड मिल्क आणि इतर आहार सप्लीमेंट्स घ्या.प्रोबायोटीक्समुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढेल. ६ – आहारात मिठाचे प्रमाण कमी करावे. ७ – आहारात व्हेजिटेबल ऑइल ऐवजी ऑलिव्ह ऑइल वापरा,ऑलिव्ह ऑईल मध्ये भरपूर ओमेगा ३ फॅटी अॅसिड असल्याने त्याच्या वापराने अस्थमा अटॅकचा धोका कमी होतो.यासाठी स्वयंपाकात इतर तेल वापरण्याऐवजी एक्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल वापरा.

८ – आवळा लसूण आलं, मध, यांसारख्या घटकांचा आहारात आवर्जून समावेश करा.सुंठ आणि मध किंवा आल्याचा रस आणि मध हे मिश्रण दम्याच्या रुग्णांसाठी हिवाळ्यात आरोग्यदायी ठरतं. ९ – शितपेये,चिप्स,स़ॉसेस हे पदार्थ खाणे टाळा.अशा पदार्थांमुळे वजन देखील वाढते.यावर उत्तम उपाय म्हणजे प्रक्रिया न केलेले फक्त सेंद्रिय पदार्थ खा. १० – निलगिरीचे तेल गरम पाण्यामध्ये घालून, त्याची वाफ घेतल्याने देखील धुळीच्या अॅलर्जीमुळे उद्भविणाऱ्या सर्दी किंवा खोकल्यापासून आराम मिळतो. या तेलाच्या वाफेमुळे सायनस चे पॅसेजेस मोकळे होतात. ११ – प्रकियान केलेले पदार्थ टाळा, म्हणजेच कच्चे पदार्थ टाळले तर उत्तम, कच्चे पदार्थ शरीरातील अल्लेर्जीचे प्रमान वाढवतात.

१२- चालण्यासारखे नियमित सौम्य व्यायाम, धूम्रपान पूर्णपणें बंद करणें आणि निरोगी पोषक आहार घेणें, या आणि अशा इतर जीवनशैली बदलांद्वारे दम्याच्या व्यवस्थापनाला बळ मिळते. १३ – एक चमचाभर मेथीदाणे पाण्यात उकळून त्यात चमचाभर आल्याचा रस आणि मध टाकून रुग्णाला दिले तर त्याचा बराच चांगला प्रभाव दिसून येतो. १४ – इनहेलर’चा दिवसभरात एकदा वापर तसेच औषधसेवनाचा कंटाळा न करणे. दमा झालेल्या रुग्णांनी जेवणात आंबट व थंड पदार्थांचे सेवन टाळावे.

अशा प्रकारे वर दिलेले काही उपाय आणि घरात करता येण्या सारखे असे उपचार केल्यास आपण दम्याला नियंत्रित करू शकतो. दमा हा आजार पुर्णपणे बरा होऊ शकत नाही मात्र तरीही योग्य ती काळजी आणि योग्य तो आहार घेतल्यास त्यावर मात करणे शक्य आहे.तरीही त्रास जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे कधीही उत्तम ठरेल.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *