हेल्थ

असाध्य कंबरदुखीला कंटालेले आहात? मग हे उपाय करून पाहा

back pain

हल्लीच्या धावपळीच्या युगामध्ये अनेक आजारानी आपल्याला आयुष्याला गिळंकृत करायला सुरुवात केली आहे, पूर्वी छोटे छोटे फारसे त्रासदायकन वाटणारे आजार आता मात्र भयंकर रुप धारण करून बसले आहेत यायलाच एक म्हणजे कंबरदुखी, पूर्वी फक्त वयस्कर लोकांना हा त्रास काही प्रमाणात जाणवायचा मात्र आता याने गंभीर रूप धारण केले आहे. कंबरदुखी, संदेदुखी, गुडघेदुखी यांसारख्या अनेक आजारांनी आता बस्तान मांडले आहे, या सदरात अशाच दुखण्याचे म्हणजेच कंबरदुखी विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.

कंबरदुखी आणि मणक्याचे दुखणे एकमेकांशी संलग्न आहेत.मणक्याच्या दुखण्यामुळे कंबरदुखी उदभवते, स्थिक्षय किंवा कॅल्शियमच्या कमतरतेमुळे पाठीचा मणका कमजोर होणे, हाता-पायामध्ये मुंग्या येणे, कंप येणे,अवयव बधीर होणे, त्यांच्यात कळा येणे, कंबरेत दुखणे,सकाळी उठताना त्रास होणे, कुशीवर वळताना त्रास होणे,किंवा पाठीच्या मणक्यातून कूस बदलताना कड कड आवाज येणे,कूस बदलताना पाठीचा मणका एकदम अवघडल्यासारखं होणे, चालताना त्रास होणे किंवा चालता न येणे, कंबरेच्या मागील बाजूने पायाच्या तळव्यापर्यत्न शीर दुखणे,मांडी घालून खूप वेळ बसू न शकणे,पायाच्या पंजाची ताकद कमी होणे, पायातील स्पर्शज्ञान कमी होणे.

शौचाला बसता न येणे,चक्कर येणे,नसांवरील असह्य़ दबावामुळे लघवीचे नियंत्रण जाणे, असे काही भयप्रद परिणामही प्रसंगी दिसून येऊ शकतात. कंबरदुखी मणक्याच्या दुखण्याचाच परिणाम आहे. यासाठी फक्त कंबरदुखी असेल तर  नियमित व्यायाम केल्याने हळूहळू फरक दिसू लागतो, मात्र यातही काही नियम आहेत जे समजून घेतले पाहिजे, अजूनही काही आजार असतील किंवा ऑपरेशन्स झाले असतील तर चुकीच्या पद्धतीने केलेलं व्यायाम ही आपल्याला अधिक संकटात टाकू शकतो.

कंबरदुखी उद्भवू नये म्हणून काय करावे – बराच वेळ ताठ बसल्याने कंबरेवर ताण येत असतो. खूप वेळ एकाच स्थितीत काम करू नये. तासनतास काम करत असाल तर मधल्या वेळेत अराम करणे गरजेचे असते म्हणजे पाठीला सैल सोडणे, थोडा वेळ खोलीत किंवा बसलेल्या जागेवर चालणे याने पाठीला अराम मिळेल. जास्त वजन उचलल्याचे ही त्रास वाढू शकतो, पाठीवर दप्तर वाहून नेणे जास्त वेळ ताटकळत राहणे यानेही हळूहळू त्रास सुरू होतो. कंबर दुखी मध्ये सायकल चालवणे , पोहणे, पाळणे , डोर उडया मारणे हे व्यायाम उवयोगी ठरतात.

जड वस्तू उचलताना झटकन ताकदीने उचलू नये याने पाठीवर अतिरिक्त ताण येतो, जड वास्तूउचलायची असल्यास पायाच्या ताळव्यांवर भर द्यावा आणि हळूहळू उचलून घ्यावे. कंबरदुखी साठी बाजारात अनेक तेल मिळतात कमरेला नियमितब मालिश  आणि व्यायाम केल्यानेही ही अराम मिळतो. कॅल्शियमची कमतरता असणे हे ही एक मुख्य कारण असू शकते, शरीरात योग्य प्रमाणत व्हिटॅमिन्स न मिळाल्याने हाडे कमजोर होतात, त्यामुळे हाडांमध्ये ठीसुळपणा वाढतो यानेच गुडघेदुखी, कंबरदुखी, पाठदुखी , सांदेदुखी यांसारखे अनेक आजार उदभवतात.

काही घरगुती उपाय – तेलाने मालिश – बाजारात अनेक प्रकारचे तेल मिळतात, काही तात्पुरता अराम ही देतात, मात्र फारसा खर्च न करता आपण घरच्या घरी तेल बनवू शकतो, खोबरेतेल घेऊन त्यात चारपाच पाकळ्या लसूण टाकून उकळून घ्यावे थंड झाल्यावर हलक्या हाताने मालिश करावी. हे तेल वेदनाशामक म्हणून काम करते.मालिश केल्यावर गरम पाण्यात मोठे जाड मीठ टाकून अर्ध्या तासानंतर अंघोळ करावी, तेल त्वचेवर पूर्ण जीरे पर्यंत मसाज केल्याने स्नायूंना आणि कमरेला ही अराम मिळतो.वेदना आणि ताठरपणा कमी होण्यासाठी  पेनकिलर्स, औषधे आणि आजार बरा होण्यासाठी बनविलेली सुधारित संधिवातावरील औषधे (डीएमएआरडीएस) हेदेखील उपचाराचे काही पर्याय आहेत. जैविकशास्त्रात उपलब्ध असणारी औषधे आता भारतातदेखील उपलब्ध असतात.

शेक देणे – गरम पाण्याची पिशवी तर अनेकदा आपल्याकडे उपलब्ध असते त्याने शेक द्याल तरी उत्तम, मात्र नसेलच तर गरम पाण्यात मीठ टाकून त्यात कापडाचा बोळा बुडवून शेक द्यावा, याने अराम मिळायला मदत होते. लक्षात ठेवा नेहमी शेक देताना अंगावर पातळ कापड असावे, गरम शेकाचा त्वचेशी थेट संबंध येता कामा नये नाहीतर जखम होण्याची पोळणे भाजण्याची शक्यता असते. म्हणून कधीही  पाठदुखी सतावत असेल आणि शेक घ्यायचा असेल तर एखादे कापड घेऊन त्यावरुन शेक द्यावा. याने स्नायूंना अराम मिळून सूज कमी होऊन दुखणे कमी व्हायला मदत मिळते. रात्री झोपेच्या वेळी हे केल्याने अराम मिळतो.आणि उत्तम झोपही लागते.

व्यायाम – नियमित व्यायाम करणे ही भरपूर फायद्याचे ठरू शकते, मात्र फिसीओथेरपिस्टच्या सल्ल्याने व्ययाम केल्यास उत्तम, कारण अनेकदा चुकीच्या पद्धतीने झोपणे, चुकीच्या पद्धतीने व्यायाम करणे अशा सवयीनमुळे आयते अनेक आजारानं आमंत्रण मिळते.बैठकी जीवनशैली व्यक्तीला पाठदुखीच्या अधिक जवळ नेते. काम न केल्याने लठ्ठपणा वाढतो, जो पाठदुखीत भर घालतो. संपूर्ण दिवस कार्यरत रहा. काही माफक नियमित शारीरिक उपक्रम जसे, 45 मिनिटे चालणे, पोहणे, किंवा अरोबिक व्यायामांसोबत वेगवेगळ्या शारीरिक ताणाच्या हालचाली निवडा. या सगळ्यांनीपाठीच्या स्नायूंचेबळकटीकरणहोईल वजन कमी होण्यास सुद्धा मदत होईल.  योगासने करणे हे स्नायूंसाठी उपयुक्त असतील अशा प्रकारचे व्यायाम अवलंबने.

वैद्यकीय उपचार – तात्पुरती वेदना शमवण्यासाठी पेन किलर घेतल्या जातात, पॅरासिटोमॉल आणि ऍसिटोमिनोफेन ही औषधे उपयोगी ठरतात, याचे काही दुष्परिणाम ही आहेत वापर करताना अति प्रमाणात सेवन करणे कधीही चूक असते. आजार दीर्घकालीन असल्यास नैराश्य येते यातून बाहेर पडण्यासाठी ही औषधे आणि गोळ्यांचे सेवन केले जाते.पाठदुखी ही भयंकर तणावपूर्ण परिस्थिती असू शकते. पाठ्दुखीसह जगणे हाच पाठदुखीच्या व्यवस्थापनातील सर्वात मोठा अडथळा आहे. घरातील आणि कामाच्या ठिकाणची दैनंदिन जीवनातील रोजची कामे कधी कधी पाठदुखीला सुरुवात करतात किंवा असलेल्या वेदना वाढवितात. कणाच्या मदतीने होत असलेल्या सततच्या हालचाली आणि शारीरिक अवस्था, त्या घरी असो की कामाच्या ठिकाणी, पाठदुखीला आमंत्रण देतात किंवा असेल्या वेदना वाढवितात. त्यामुळे पाठदुखी दूर ठेवायची असल्यास कामाच्या ठिकाणच्या आणि घरातील त्या हालचालींना ओळखणे आणि टाळणे आवश्यक आहे ज्या दुखण्याला सुरुवात करतात.

शरीरयष्टी आणि पौष्टिक आहार – उत्तम शरीरयष्टी राखणे हे ही अगदी महत्त्वाचे आहे कारण बऱ्याचदा आपल्या शरीराच्या बेढबपणा मुळे स्नायुंवर आणि हाडांवर अतिरिक्त ताण येतो. यामुळेच हळूहळू त्रास वाढायला सुरवात होते. फास्टफूडचे सेवन, अतिप्रमाणात तेलकट, आणि मैद्याचे पदार्थ खाणे याने हळूहळू त्रास वाढू लागते, हाडांची झीज होऊ लागते, यामुळे आजाराना आमंत्रण मिळते, हाडे कमजोर होऊन त्रास सुरू होतो, शरीराला पुरेसे व्हिटॅमिनन मिळाल्याने आरोग्याला हानी पोहोचते.कॅल्शियमची कमतरता असणे हे ही एक मुख्य कारण असू शकते, शरीरात योग्य प्रमाणत व्हिटॅमिन्स न मिळाल्याने हाडे कमजोर होतात, त्यामुळे हाडांमध्ये ठीसुळपणा वाढतो यानेच गुडघेदुखी, कंबरदुखी, पाठदुखी , सांदेदुखी यांसारखे अनेक आजार उदभवतात.त्यामुळे योग्य आहार घ्यावा.

नियमित कामे आणि जीवनशैली – नियमित कामे म्हणजेच कॉम्प्युटरसमोर बसून तासनतास काम करणे, एकाच स्थितीत खुप वेळ बसून राहणे, वाकडे चालणे, कळ लागेपर्यंत ताटकळत बसने,आणि धूम्रपान करने यामुळेच आरोग्य बिघडते, त्यामुळे हे करणे कटाक्षाने टाळावे. आहारात योग्य प्रमाणत व्हिटॅमिन्स असतील अशा फळे आणि भाज्याचा वापर करावा. दुचाकी चालवताना पाठीला कोणताही आधार नसतो. रोज लांबचा प्रवास करणाऱ्या तसेच खड्डे असलेल्या रस्त्यांवरून गाडी हाकणाऱ्यांना हमखास पाठदुखी सतावते. ड्रायव्हिंगही करताना पाठीला योग्य आधार घ्या. लांब प्रवासादरम्यान भरपूर विश्रांती घ्या.फ्लॅट शूज वापरल्याने पाठीवर कमी ताण येतो त्यामुळे उंच ताटाच्या चप्पल वापरणे कमी करा. या आजारात सुधारणा होण्यासाठी जीवनशैलीमध्ये बदल आवश्यक असून ती पहिली  पायरी आहे. वेदना आणि त्रास कमी करण्यासाठी देण्यात  आलेला चांगला शारीरिक व्यायाम ही गरज आहे. पोहणे, योगा करणे आणि इतर व्यायाम यामुळेदेखील मदत होते.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *