हेल्थ

कोवळ्या बांबूची भाजी खाल्ली आहे का कधी? एकदा करूनच बघा

बांबूची भाजी

बांबू ही भाजी खातात याच्यावर काहीजणांचा विश्र्वासच बसणार नाही कारण ज्याच्यापसून शो च्या वस्तू बनवतात, कानातले बनवतात, टेबल, खुर्च्या अशा अनेक प्रकारे वापर होणारा बांबू हा खरंच भाजीसाठी वापरला जातो का? असे अनेकांना वातात असेल. पण खरंच ही भाजी खाल्ली जाते. ही भाजी जास्त करून कोंकणात केली जाते. या बांबूचे कोवळे कोंब उगवतात तेव्हा हे कोंब सोलून याची भाजी केली जाते.

हे बांबू जेव्हा पावसाळ्यात उगवतात तेव्हा यांची भाजी केली जाते. पण यांची खरच लागवड केली केली आणि ही भाजी सर्वांनी खाल्ली तर या व्यवसायाला चांगली प्रेरणा मिळेल. त्यासाठी या झाडांना लागवड करून पाणी घालायला हवे जेणेकरून त्यांना बारा ही महिने कोंब येतील आणि ही पौष्टिक भाजी आपण कधीही खाऊ शकू. तसेच या कोवळ्या बांबूचे लोणचे तसेच कढी ही बनवली जाते.

त्याची भाजी बनवणे खूप साधी पद्धत आहे हे कोवळे आणि मांसल कोंब आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी आहे. ही भाजी खूपच उपयोगी आहे पहिली म्हणजे ही भाजी बाळंतिणीला करून दिली जाते. यामुळे काय होते तर तिचा विटाळ पूर्णपणे साफ होतो याशिवाय नाळ पडून गेल्यावर तिच्या गर्भाशयाची पूर्ण शुध्दी व्हावी. बांबूच्या भाजीत भरपूर प्रमाणात क्षार असतात. याशिवाय तंतुमय पदार्थ ही भरपूर प्रमाणत असतात

आता ही भाजी कशी करावी?
याचे कोवळे कोंब जेव्हा पावसाळ्यात उगवतात तेव्हा ते कोंब काढून त्याचा कोवळा असा भाग घ्यायचा हा भाग एकदम मऊ असतो त्याचे तुकडे करून चिरून मिठाच्या पाण्यात आदल्या दिवशी रात्री भिजत ठेवा. म्हणजे यांचा उग्र वास जाईल.

ही भाजी दुसऱ्या दिवशी धुवून कुकर मध्ये शिजवून मस्त नेहमी सारखी फोडणी ला दया त्यात थोडी कोणतीही डाळ भिजवून ठेवा आणि मग टाका. वाटल्यास थोडे गूळ टाका छान लागते ही भाजी. याशिवाय हे चेचलेले कोंब मसाला लावून घ्या आणि रवा लाऊन मच्छी सारखे फ्राय करा. छान लागतात एकदा करून बघा.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *