हेल्थ

डेंग्यू भयानक आजारावर पपईची पाने आहेत गुणकारी वाचा कसे

पपईचे झाड आणि त्याला लागलेली हिरवी आणि पिवळी पपई बघताच तोंडाला पाणी सुटते. गावा ठिकाणी घराच्या अंगणात सगळीकडेच पपईची झाले दिसतात. या पपईची पाने शिजवून किंवा कच्ची खाल्ली जातात. पपईच्या पांनांमधे अँटीऑक्सिडंट्स, फ्लेव्होनॉइड्स, कॅरोटीन, व्हिटॅमिन ए, बी, सी, डी आणि ई इत्यादी महत्त्वाचे घटक आढळतात. पपई ची पाने आपल्या शरीरासाठी अधिक फायदेशीर आहेत.

जेव्हा आपल्याला डेंग्यू होतो या पांनांचा रस पिल्ला जातो. या पांनांच्या सेवनाने अधिक फायदा होतो तो म्हणजे आपल्या शरीरातील रक्ताच्या प्लेटलेट्स वाढतात. डेंग्यू झाल्यावर पपईच्या पांनांचा रस फायदेशीर ठरतो. ताप आणि डोकेदुखी पासून आराम मिळतो डेंग्यू मुळे रक्तातील प्लेटलेस कमी होतात त्या वाढण्यास मदत होते.

पपईच्या पानात पॅपिन इंझाइमचे भरपूर प्रमाण असते त्यामुळे तुमची पचनसंस्था मजबूत होते. पोटातील गॅस, एसिडी टी, जळजळ, अपचन, बद्धकोस्टता हे आजार होत नाहीत. स्त्रियांना पाळीच्या वेळेस ओटी पोटात दुखते अशावेळी या पपई ची पाने थोडे मीठ आणि चिंच यांचा काढा करून पिने आराम मिळतो.

या पानांच्या रसात रोगप्रतिकार शक्ती भरपूर प्रमाणात असते त्यामुळे तुमचे विविध आजारांपासून ही रक्षण होते.पपईच्या पांनांचा रस हा अँटी मलेरिया म्हणून मानला जातो त्याचे सेवन केल्याने मलेरिया होत नाही.पपईच्या पांनांचा रस घेतल्याने यकृताचे आरोग्य सुधारते. तसेच कोलेस्टेरॉलची पातळी ही संतुलित राहते.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *