संग्रह

भारतीय रुपयाचे मूल्य डॉलर्सच्या बरोबरीने असलेले देश इथे पर्यटनाला जाल तर दाम दुप्पट फिरता येईल

भारतात डॉलरची किंमत तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे म्हणूनच दुसऱ्या देशात काम करण्यासाठी करोडो भारतीय तरुण तरफडत असतात. कुठल्या ना कुठल्या मार्गाने तिथे जाऊन आपले बिर्हाड मांडायचे या हेतूने बऱ्याच गोष्टी केल्या जातात. पण तुम्हाला माहीत आहे का जसे भारताच्या तुलनेत डॉलर मोठा आहे तसेच काही देशांच्या तुलनेत भारताचा रुपया देखील खूप मोठा आहे. अशाच काही देशांमध्ये जर तुम्ही पर्यटनासाठी म्हणून गेलात तर अगदी कमीत कमी पैशात सगळा देश फिरून येऊ शकता. अशाच काही देशांविषयी आपण जाणून घेणार आहोत.

जिथे गेल्यावर आपला रुपया फक्त दुप्पट नाही तर तिन पट, चार पट आणि काही ठिकाणी तर पाचपट देखील होतो. मग असं झालं तर तुम्हाला तिथे फिरायला फारच जास्त वाव असेल. तर चला तर मग अशाच भन्नाट देशांची वारी करूया.. जरी डॉलर जगात शक्तीशाली असला तरी भारतीय रुपया या देशांमध्ये मोठा आहे. कारण काही देशांमध्ये रुपयाची किंमत चांगली आहे. त्यामानाने या देशांचे चलन रुपयाच्या किमतीपेक्षा कमी आहे. त्यामुळे या देशांत रुपया मोठा आहे. त्यामुळे तुम्ही या देशात चांगले शॉपिंग करु शकता.

पॅराग्वे – हा आहे जगातील सर्वात स्वस्त देश. पॅराग्वे हा जगातील सर्वात स्वस्त देश आहे. भारतीय रुपयाला येथे डॉलरप्रमाणे स्थान आहे. १ रुपया म्हणजे ८४.३७ गुआरनी होय. येथील लॅडस्केप, वॉटरफॉल आणि रिवट राफ्टिंगचा आनंद लूटु शकता.निसर्ग देखील सूंदर आहे म्हणजे जाण्याचा योग आला तर नक्की जा कारण तिथे आपल्याला डॉलरशाही थाटात फिरता येईल. बाकी शॉपिंग वगैरे करण्याची असेल तर बक्कळ करता येईल मात्र तिथल्या सारखी. आपल्या सारख्या वस्तू मिळणे थोडे कठीण आहे तर हा आहे जागतिल सर्वात स्वस्त देश आता उतरत्या क्रमाने बाकी देश पाहूया जे असेच स्वस्त आहेत.

श्रीलंका – कधी काळी हा प्रदेश अतिशय श्रीमंत होता. मात्र आता श्रीलंकेच्या चलनाची किंमत ही भारतीय चलनाच्या खालची आहे.भारताचा शेजारी देश श्रीलंका. या देशात रुपया भारी आहे. १ रुपया म्हणजे २.१४ श्रीलंकन रुपया होय. श्रीलंका बेट असल्याने येथील समुद्राचा आनंद लूट शकता. निर्सग रचना चांगली असून रामायणाशी संबंधी काही जुने अवशेष येथे पाहायला मिळतात.तिथे जाऊन तुम्हाला सर्वात जास्त पुरातन काळातल्या वस्तू आणि प्राचीन संस्कृती आणि इतिहासाचे जवळून दर्शन घेता येईल. एकंदरीत बेट असल्याने इथे निर्सर्ग सौदर्य भरभरून मिळेल. तर मग करा बॅग पॅक आणि जा..!!

झिम्बाब्वे –  तुम्ही आफ्रिका खंडातील झिम्बाब्वे या देशाच्या सफरीवर जात असाल तर ते तुमच्यासाठी फायदाचे ठरते. कारण १ रुपया म्हणजे ५.८८ झिम्बाब्वे डॉलर. मात्र आफ्रिका खंडात सगळीकडेच असे नाही परंतु झिम्बाब्वे मध्ये तुम्हाला जास्त फिरायला मिळेल. कारण तुमचे पैसे पाचपट होतील. त्यामुळे परदेश पर्यटन करताना ते फायद्याचे ठरते. येथील जंगलाची सफर करुन मोठे हत्ती, जिराफ पाहू शकता.त्या शिवाय इथे सुंदर असे निसर्गदर्शन देखील घडते एकदा भेट देऊन नक्की अनुभवा.

व्हिएतनाम – हे नाव ही खूपदा ऐकले असेल इथे अतिशय सुंदर असा निसर्ग अनुभवायला मिळेल,आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपले पैसे इथे कितीतरी पटीने वाढतील तेवढ्यात तुमचं खूप काही फिरून होईल. व्हिएतनाममध्येही भारतीय रुपया मोठा आहे. येथे १ रुपया म्हणजे ३४१ डॉन्ग. येथे पर्यटनासाठी सुंदर डोंगर पाहू शकता. तसेच नदीमध्ये बोट राईट करु शकता. हा क्षण तुमच्यासाठी अवर्णीय असेल.

मंगोलिया – इतिहासातील उत्साही लोकांसाठी आणखी एक जागा म्हणजे मंगोलिया. साहसी आणि इतिहासाच्या परिपूर्ण मिश्रणाने, आपल्याकडे मजेसह संस्कृतीची उत्कृष्ट चव असू शकते. आपण भटक्या विमुक्त लोकांच्या जीवनशैलीची झलक पाहू शकता आणि मंगोलियन संस्कृती काय आहे ते पाहू शकता. आपण बर्‍याच इतर रीफ्रेश क्रियाकलापांमध्ये देखील गुंतू शकता. त्या व्यतिरिक्त, आपण आश्चर्यकारक पाककृती आनंदात देखील सहभागी होऊ शकता. एक भारतीय रुपया = 33 मंगोलियन तुग्रीक असेल.

हंगेरी –  युरोपीन देशांपैकी एक हंगेरी. या देशात रुपया मजबूत आहे. १ रुपया म्हणजे ४.१२ फोरिंट होय. या ठिकाणी उंच इमारती आहेत. तसेच हंगेरी मध्ये निर्वासितांचे पुनर्वसन केले गेले आहे. येथील कॅसल्स हंगेरी वर्ल्ड प्रसिद्ध आहे. इथेही पाहायला बऱ्याच गोष्टी मिळतील तुम्हाला.

जपान – होय होय जपान, आपण तिथे गेलो तरी आपला रुपया तिथल्या चालनावर भारी आहे. जपान या देशातही रुपया मोठा आहे. १ रुपया म्हणजे १.८१ येन. जपानवर दोन आण्विक हल्ले (अणू बॉम्ब) झालेत. तसेच भूकंप प्रवण क्षेत्र म्हणून ओळख आहे. या देशात तुम्ही पर्यटन करु शकता. पण व्हिसा ऑन आगमन सुविधा येथे उपलब्ध नाही. तुम्ही फिरण्यासाठी म्हणून इथे नक्कीच भेट देऊ शकता.

पाकिस्तान – हो बरोबर ऐकले आपला लाडका पाकिस्तान, इथेही आपला रुपया मोठा आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं तर इथे तुम्हाला डबल मिळतील. आपला  १ रुपया तेव्हा तिकडचे २.१७ रुपये. म्हणजे इथेही तुम्हाला डबल बेनिफिट मिळेल. मात्र तिकडे गेक्यावर नक्षलवादी आणि तालिबानी दहशतवादी यांच्यापासून सावधान..! बाकी तिथेही खूप सुंदर असे निसर्गसौंदर्य पाहायला मिळते, चिनी पाकिस्तान भाई भाई अस आहे ना काही तेव्हा चिनी, जपानी, कोरियन वगैरे लोकं पाकिस्तान ला खूप भेटी देतात, आणि महत्त्वाचं म्हणजे पाकिस्तान मध्येही काही प्रमाणात इतिहासीक वस्तू आहेत मात्र फाळणी नंतर बनलेला देश असल्याने याला स्वत्ताचा असा इतिहास असणे शक्य दिसत नाही. आजही धागेदोरे भारताशीच जोडले गेलेले आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने जायचे असेल तर नक्की भेट द्या.

इंडोनेशिया – इंडोनेशिया हा प्राचीन काळापासून भारताचा जवळचा मित्र राहिला आहे. येथेही भारतीय रुपया मोठा आहे. १ रुपया बरोबर इंडोनेशिया २१५ रुपैया होय. इंडोनेशियाला मोठा सांस्कृतिक वारसा लाभला आहे. येथील बाली हे लोकल कल्चर जाणून घेण्यासाठी चांगले ठिकाण आहे. आपल्याशी मिळते जुळते कल्चर असलेला हा देश पाहायला देखील खूप सुंदर आहे.

कंबोडिया – इतिहासाची सुगंध असणारी अशी जागा ज्याच्या प्रत्येक वक्र आणि वळणावर इतिहास कोरलेला आहे, शतकानुशतके इतिहासाच्या बुफांनी हे स्थान सजविले आहे. बरीच ऐतिहासिक ठिकाणे, अवशेष आणि काही नामशेष झालेल्या संस्कृतीचे अवशेष असल्यामुळे हे ठिकाण पर्यटकांना आकर्षित करते जे असंख्य कथा जाणून घेण्यासाठी उत्साही आहेत त्यांनी या ठिकाणाला नक्की भेट द्यावी. कंबोडिया हे जंगलाने भरलेले आहे आणि जवळजवळ एक तृतीयांश क्षेत्र व्यापलेले आहे. कंबोडियात, हरवलेल्या सभ्यता, शहरे आणि इमारतींचा शोध घेण्यासाठी आपण जाऊ शकता. 1 रुपया = 61.29 कंबोडियन रीएल्ससह चलन गुणोत्तर देखील आपल्या बाजूने आहे, जेणेकरून, आपण अगदी कमी दरात सर्व मजा करू शकता.

कॉस्टा रिका – कॉस्टा रिका हा दक्षिण अमेरिकन देश आहे. निसर्गाच्या दृष्टीने बऱ्याच सुंदर गोष्टी तुम्हाला इथे पहायला मिळतील. येथेही रुपया चलन मोठे आहे. १ रुपया म्हणजे ८.१५ कोलोन्स होय. इथे फिरायला तुम्हाला जास्त मजा येईल विशेषतः  येथील समुद्र ठिकाणे तुम्हाला मोहात पाडतील. त्यामुळे फिरण्यासाठी तुम्ही येथे जाऊ शकता. शिवाय बोटिंग रायडिंग वगैरे सर्व काही करू शकता.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *