मनोरंजन

यूट्यूब ते झी मराठी असा सुखद प्रवास करणारी कावेरी म्हणजेच भाग्या नायर नक्की आहे तरी कोण?

Bhagya Nair

रात्रीस खेळ चाले ह्या मालिकेचा पहिला आणि दुसरा भाग अत्यंत लोकप्रिय ठरला. दोन्ही भाग लोकांना खूप जास्त आवडले आणि त्याचमुळे निर्मात्यांनी तिसऱ्या भागाची सुद्धा पर्वणी लोकांसमोर वाढून ठेवली. अण्णा नाईक पुन्हा येणार हे ऐकून अनेकांना सुखद धक्का बसला. मालिकेला सुरुवात झाली आणि नवीन पात्राची ओळख सुद्धा आपल्याला झाली.

मालिकेत काही पात्रे बदलण्यात आली आहेत ती म्हणजे सुसल्या आणि अभिरामची दुसरी बायको कावेरी. तुम्हाला हे माहितीच असेल. पण कावेरीचा अभिनय पाहून सर्वांना हाच प्रश्न पडला आहे की नक्की ही कावेरी आहे तरी कोण? कारण ह्या अभिनेत्रीला यागोदर कोणत्याही मालिकेत तुम्ही पाहिले नाही.

पण खर तर ही अभिनेत्री मल्याळम असून ती आपल्यासारखेच मराठी बोलते कारण तिने मराठी चे शिक्षण घेतले आहे. ती मुंबई मध्येच स्थाईक असून अनेक यूट्यूब व्हिडिओ मध्ये तुम्ही तिला पाहिले असेल. यूट्यूबवरील एक नामवंत मराठी चॅनल Itsuch च्या अनेक व्हिडिओ मध्ये तुम्ही तिला पाहिले आहे.

ह्या अभिनेत्रींचे खरे नाव आहे भाग्या नायर आहे. तिला अभिनयाची आवड लहानपणा पासूनच होती. महाविद्यालय शिक्षण घेतानाच तीने एकांकिका स्पर्धेत भाग घेतला होता. इथूनच तिला अभिनय करियर करण्याची ओढ लागली. २०१९ मध्ये तिला उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून सुंदरी ह्या नाटकासाठी पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार अभिनेत्री मुक्ता बर्वे कडून तिला मिळाला होता.

अटळ करंडक आणि अहमदनगर करंडक मध्ये दोन्ही ठिकाणी उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून तिने हा पुरस्कार स्वीकारला आहे. भाग्याला अभिनय करण्या बरोबर नृत्य करण्याची फार आवड आहे. त्यामुळे तिने भरतनाट्यमचे प्रशिक्षण ही घेतले आहे. एका महाविद्यालयात तिने नृत्य शिक्षिका म्हणून सुद्धा काम केलं आहे.

ItSuch चॅनेलवर भाग्याने अनेक व्हिडिओ मध्ये चार चांद लावले आहेत. ह्यामध्ये तुम्ही कूच्छ मिठा हो जाए, जेव्हा ती प्रपोज करते, माय स्कूल क्रश, डेट आणि बरेच काही,माझ्या Gf चा मित्र, जेव्हा तुम्ही आजारी असता, द लास्ट कॉल, द प्रपोजल, एड लागलंय, दिवाळी आली, मैत्रीण, द चिझी कपल, जेव्हा तुम्ही रेस्टॉरंट मध्ये जाता, boomerang, द सरप्राइज, कॉल सेंटर चे कॉल, कांदे पोहे ऑनलाईन, जेव्हा बाप्पा येतो, भेटशील का पुन्हा, ब्रेक अप के बाद, नऊ महिने नऊ दिवस ह्या तिच्या काही मोजक्या व्हिडिओ आवर्जून पहा.

भाडीपा सोबत सुद्धा तिने काम केलं होतं. काहीच दिवसापासून तिची शुभमंगल सावधान ही वेब सिरीज तुफान वायरल वायरल होत आहे. ह्या मध्ये तिची सुमेत चव्हाण सोबत चांगलीच के दिसत आहे. ह्या सिरिजचे चार भाग आहेत आणि चारही यूट्यूबवरून तुम्ही पाहू शकता.

भाग्या सध्या कावेरी म्हणून सर्वांच्या हृदयावर राज्य करत आहे. तिने आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत. पण तिला हा रोल सोशल मीडिया मार्फत मिळाला हे खूप कमी लोकांना माहीत आहे. रात्रीस खेळ चाले चे लेखक आणि तुम्हा आम्हा सर्वांच्या आवडीचा पांडू म्हणजेच प्रल्हाद कुडतरकर ह्यांनी तिचे यूट्यूब वरील काम पाहिलं होतं. त्यामुळे स्वतः त्यांनी इंस्टाग्राम वर मेसेज करून तिला ऑडिशन साठी बोलावून घेतलं. ऑडिशन देऊन तिने हा रोल पदरात पाडून घेतला.

तुम्हालाही ही कावेरी आवडते का? कसा वाटतोय तिचा अभिनय आम्हाला नक्कीच कळवा.

Previous ArticleNext Article