हेल्थ

भाकरी की चपाती? आपल्या शरीराला काय योग्य आहे

आपल्या भारतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा आहार घेतला जातो. त्याचप्रमाणे मुख्य अन्न म्हणजे भाजी सोबत खाल्ली जाणारी भाकरी किंवा चपाती यात ही विविधता आढळते. कुठे गव्हाची चपाती खातात तर कुठे ज्वारी बाजरीची भाकरी तर कुठे तांदळाची तर नाचणीची भाकरी खाल्ली जाते.

आता तुम्ही जे काय खात असाल ते तुमची आवड किंवा उपलब्ध असेल ते खाणे हे आलेच. पण आपल्या शरीरासाठी चपाती पेक्षा जास्त करून भाकरी ही जास्त गुणकारी आहे हे तुम्ही लक्षात घ्या. तस बघायला गेलात तर गहू हे पित्तकारी असतात, गव्हामधे एक घटक असतो त्याचे नाव आहे ग्लूटेन हा सर्वात जास्त आपल्या शरीराला अपाय करत असतो.

म्हणून चपाती खाल्ल्याने कधीकधी अँसिदिटी, उलटी, पित्त, मळमळ, गॅस, ढेकर हे होत असते त्यामुळे त्यांची पचनशक्ती मजबूत आहे त्यांनी खा. पण त्यांची कमकुवत आहे त्यांनी कमीच खा. याशिवाय भाकरी पेक्षा चपातीमधे साखरेचे प्रमाण जास्त असते याशिवाय ज्वारी किंवा बाजरीची भाकरी आपल्या शरीरासाठी गुणकारी आहे.

त्यात भरपूर पौष्टिक घटक आहेत त्यात क्षार भरपूर प्रमाणात असतात शिवाय भाकरी मध्ये तेलाचे प्रमाण नसतेच त्यामुळे ती हेल्दी ही असतेच. ज्वारी, बाजरी पासून बनणाऱ्या भाकरी या पोळी पेक्षा अधिक पौष्टिक घटक असतात. मुळात गहू पित्तकरी असून ज्वारी-बाजरीमध्ये क्षारही असतात त्यामुळे आरोग्यासाठी चांगले आहेत, शिवाय चपातीमध्ये साखरेचे प्रमाण ज्वारी-बाजरी पेक्षा जास्त असते म्हणून मधुमेहाच्या रूग्णांना डॉक्टरस चपाती ऐवजी भाकरी खाण्याचा सल्ला देतात. आणि बाजरी शिवाय नाचणीची भाकरी अतिशय लोकप्रिय असून ती चवीला चांगली असते.

ज्वारीची आणि बाजरीची भाकरी खाल्ल्याने अनेक फायदे मिळतात पहिला म्हणजे मूळव्याध होण्याचा चान्स कमी असतो. ज्वारीच्या भाकरीत तंतुमय पदार्थ भरपूर असतात त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते सध्या ब्लड प्रेशर याच्या वाढणाऱ्या प्रमाणावर निर्बंध लादण्यासाठी पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्समुळे ब्लडप्रेशर याचे प्रमाण असणारी ज्वारीची आणि बाजरीची भाकरी खाल्ल्याने ते नियंत्रणात राहते.

याशिवाय ज्वारीच्या भाकरीत लोहाचे भरपूर प्रमाण असल्यामुळे अनेमिया झालेल्यांना याचा खूप उपयोग होतो. तसेच मुतखडा असलेल्यांसाठी आणि ज्यांना सारखी असिडीटी होते अशाना ही भाकरी खाणे गुणकारी आहे. बाजरीच्या भाकरी त कॅल्शिअम भरपूर प्रमाणत असल्यामूळे तुमची हाडे मजबूत होतात.

ज्वारी आणि बाजरी च्या भाकरी मध्ये कॅलरीज कमी असतात त्यामुळे तुम्हा वजन कमी करायचे असेल तर भाकरी खा. तसे बघायला गेला तर नाचणी ची भाकरी जास्त पौष्टिक असते नाचणी च्या भाकरीत भरपूर कॅल्शिअम असते शिवाय गरोदर महिलांसाठी उत्तम त्यामुळे त्यांना कॅल्शिअम च्या गोळ्या खाण्याची गरज वाटत नाही. वजन कमी करण्यास मदत होते . याशिवाय मुलांच्या वाढीस ही नाचणी उत्तम पर्याय आहे.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *