मनोरंजन

बिग बॉस मराठी सिझन 3 मध्ये दिसणार हे कलाकार

सगळ्यांचाच आवडता रिॲलिटी शो म्हणजे मराठी बिग बॉस. याचे दोन्ही सेझन हिट झाले पण गेल्यावर्षी कोविड मुळे हा शो रद्द करण्यात आला होता. पण यावर्षी मात्र हा शो नक्की प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रसार मध्यामतून या शोची सुरू होण्याची घोषणा गेली आहे त्यामुळे प्रेक्षक खुश आहेत तर नेहमी प्रमाणे प्रेक्षकांच्या मनात उस्तुक्ता असते ती या सिजन मध्ये कोणकोणते कलाकार असणार आहेत.

या शो मध्ये संग्राम समेल हा असणार आहे त्याने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. रसिका सुनील हिने माझ्या नवऱ्याची मालिका यात नकारात्मक भूमिका केली होती आणि प्रेक्षकांना ती खूप आवडली होती. नंतर येत आहे वनिता खरात ही अभिनेत्री महाराष्ट्राची हास्य जत्रा या मधून आपल्याला दिसते गेल्या वेळी ती नुड फोटोग्राफी प्रसिद्ध झाली होती. याशिवाय नेहा जोशी हिने खूप मालिका आणि चित्रपट मधे काम केले आहे.

यानंतर येत आहे किशोरी अंबिये ही सध्या सहकुटुंब सहपरिवार या मालिकेत नकारात्मक भूमिका करत आहे शिवाय ती एक उत्तम अभिनेत्री आहे हे सर्वांना माहीत आहे. शाल्मली कोळगडे ही एक उत्तम गायिका आहे. त्यानंतर येत आहे ऋषी सक्सेना हा मराठी नाही पण त्याने काहे दिया परदेश या मराठी मालिकेतून. नंतर येत आहे तृप्ती देसाई ही एक भारतीय कार्यकर्ती आहे.

शिवाय यात असणार आहे सुप्रसिद्ध नायिका भार्गवी चिरमुले हिने अनेक मालिका आणि चित्रपट मधे काम केले आहे. यानंतर येत आहे ऋतुजा बागवे चंद्र आहे साक्षीला, नांदा सौख्य भरे या मराठी मालिकेत ती आपल्याला दिसली होतो. नेक्स्ट येत आहे गौरव घाटनेकर नंतर येत आहेत चिन्मय मांडलेकर हा एक अभिनेता आणि निर्माता आहे. त्यानंतर येत आहे अभिनेत्री पल्लवी पाटील हिने ही अनेक मराठी चित्रपट केले आहेत. नेक्स्ट आहे सागर देशमुख वाय झेड आणि dr बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटात भूमिका केली आहे.

त्यानंतर येत आहे विदुला चौघुले ही जीव झाला येडा पिसा यात आपल्याला दिसली आहे.त्यानंतर येत आहे रुचिरा ती आपल्याला माझ्या नवऱ्याची बायको यात नकारात्मक भूमिकेत दिसली होतो. आता येत आहे अभिनेत्री ईशा केतकर हिने जय मल्हार मालिकेत काम केले आहे. आदित्य बिलाकी हा एक यूटुबर आणि डान्सर आहे याशिवाय तो रसिका सुनील हीचा बॉयफ्रेंड आहे. तर चला यावेळी बिग बॉस बघण्यात तितकीच मजा येणार आहे.

मराठी बिग बॉस ३ मध्ये वर दिलेले सर्व स्पर्धक ऑनलाईन सर्वे मधून समोर आले आहेत. शो सुरू झाला की ह्यातील काही नावे असतील तर काही गायब झालेली असतील. शो चे सूत्रसंचालन नेहमी प्रमाणे महेश मांजरेकर हे करणार आहेत आणि हा शो काहीच दिवसात कलर्स वाहिनीवर येणार आहे.

Previous ArticleNext Article

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *