मनोरंजन

बिग बॉसच्या घरात पहिल्यांदाच दुमदुमणार आगरी कोळी आवाज

मराठी बिग बॉस 3 मध्ये कोणकोण स्पर्धक असतील याची सर्वांनाच उस्तुकता आहे. पण आता काही काळाने ही उस्तुकता संपत येणार आहे. हळू हळू सर्व स्पर्धक आपल्या समोर येतील पण आता एका पहिल्या स्पर्धकांची खबर आपल्याला मिळाली आहे. यावेळी बिग बॉस 3 मध्ये येत आहे आपला जवळचा गायक संतोष चौधरी म्हणजेच आगरी कोळी गायक दादुस.

संतोष चौधरी याला दादुस या नावाने ओळखतात आणि हाक मारतात. त्यांचा जन्म ठाण्यात झाला आहे. कामत घर येथील स्थानिक रहिवासी आहेत. याशिवाय ते ऑर्केस्ट्रा आणि कॅसेट सिंगर म्हणून प्रसिद्ध आहेत. हळदीची गाणी म्हणण्यात ते एक नंबर आहेत. तसेच लग्न, जत्रा, देवीदेवतांची गाणी, पालखी सोहळा, अशा वर अनेक प्रकारांनी गाणी गाऊन प्रेक्षकांची मने जिंकली आहे.

Source Dadus Social media

महाराष्ट्र संगीत कला अकॅडमीमध्ये अध्यक्ष म्हणून त्यांची ह्या आधीच निवड करण्यात आली आहे. या अकॅडमी मध्ये त्यांची बिनविरोध तीन वर्षांसाठी निवड केली. त्यांना हे अध्यक्ष पद मिळाल्यामुळे कोळी आणि आगरी समाजात आनंद व्यक्त होत आहे. पण आज आपला मराठी गायक हा एका स्पेशल मराठी मंचावर म्हणजे बिग बॉस 3 या शो मध्ये पदार्पण करत आहे.

वाचा कधीपासून सुरू होतोय बिग बॉस पर्व ३.

पहिल्यांदाच बिग बॉसच्या घरात आगरी कोळी गाण्याचा आवाज दुमदुमणार आहे. हे पाहणे खूप जास्त रंजक ठरेल. त्यामुळे आपण ही त्याला या शो मध्ये बघण्यात उस्तुक असाल ना? बघुया दादुस या शो मध्ये येऊन काय धमाल करतोय ते.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *