मनोरंजन

बिग बॉस मराठी पर्व तिसरे ह्या तारखेपासून सुरू होतोय

बिग बॉस हा शो आपल्यासाठी नवीन नाही. नेहमी वादग्रस्त आणि TRP खेचणारा शो म्हणून त्याची ओळख आहे. नेहमी प्रेक्षक ह्या बिग बॉसची आतुरतेने वाट पाहताना दिसतात. म्हणायला गेलात तर वर्षातून एकदा येणारा हा शो प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. त्यातील कलाकार हे काही ओळखीचे असतात तर काही अनोळखी पण काही दिवसातच ते सर्व ओळखीचे होतात.

यावेळी ही सध्याचं कलर्स मराठीवर बिग बॉस ३ प्रोमो रिलीज झाला आहे म्हणजे आता बिग बॉसची वाट पाहणे संपलेले आहे. तर मराठी बिग बॉस 3 हा शो 19 संप्टेंबर पासून सुरू होणार आहे आणि त्याची वेळ सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 7 वाजता असणार आहे. याशिवाय शनिवार आणि रविवार रात्री वाजता 9.30 आपल्याला पाहायला मिळणार आहे.

बिग बॉस मराठी ३ मध्ये हे स्पर्धक असणार

आता संध्याकाळी 7 वाजता कलर्स मराठी वर जी मालिका चालू आहे “बायको अशी हवी” ही मालिका बंद होऊ शकते. आणि “शुभ मंगल ऑनलाईन” या मालिकेच्या वेळात ही बदल होऊ शकतो. बिग बॉस 3 च शूटिंग इतकं लांबविण्यात का आल कारण याचा पहिला प्रोमो यागोदरच दाखविन्यात आला होता पण महेश मांजरेकर यांची तब्बेत बरी नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता.

पण आता बिग बॉसच्या घराचे काम ही पूर्ण झाले आहे आणि महेश मांजरेकर यांची तब्बेत ही ठीक आहे त्यामुळे मराठी बिग बिग बॉस आणि त्याचबरोबर हिंदी बिग बिग बॉस ही सुरू होऊन दोन आठवडे झाले आहेत. दोन्ही बॉग बॉसचे प्रेक्षक हे वेगळे असतील पण काही स्वरूपात एक ही असतील. त्यामुळे तुम्ही कोणता बिग बॉस बघाल ते ही कॉमेंट करून सांगा.

तर मराठी बिग बॉस 3 च्या या सिजन साठी तुम्ही उस्तुक आहात? स्पर्धक म्हणून तुम्ही कुणाला पाहणार? याशिवाय “बायको अशी हवी ही मालिका तुम्हाला आवडते का आणि ही मालिका जर संपली तर तुम्ही या मालिकेला मिस कराल का ते कॉमेंट करून नक्की सांगा.

Previous ArticleNext Article

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *