बातमी

जम्मू कश्मीर मधून पोलिसांसाठी आनंदाची बातमी

Command Vehicle

जम्मू काश्मीर मधील पोलिस आणि तेथील बंदोबस्त नेहमीच सक्त असतो. नेहमीच तिथे घुसखोरी, शत्रू सोबत सामना होत असतो. ह्यामुळे तेथील पोलिसांना ह्याचा सामना करावा लागतो. २४ तास पहारा देऊन सुद्धा कधी कधी सुरक्षा अपुरी पडते. तरी कधी यंत्रणा कमी पडतात. पण तरीसुद्धा त्याच जोशाने आणि त्वेषाने पोलिस आणि जवान तिथे लढत असतात.

घुसखोरी करणारे कटकारस्थानी काही ना काही मार्गाने पोलिस आणि जवानांना त्रास देत असतात. पण अशातच एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ती वाचून तुम्हाला तर चांगले वाटेलच पण ह्याचा फायदा तेथील स्थानिक पोलिसांना खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे.

Command Vehicle सेवेत रुजू

भारत सरकार मार्फत पोलिसांच्या ताफ्यात आता कमांड व्हीकल (Command Vehicle) रूजू झाली आहे. ह्या गाडीची जबाबदारी CRT म्हणजेच क्राइसिस रिस्पांस टीम कडे सोपवण्यात आली आहे. ही टीम तेथील घुसखोरांनसोबत नेहमीच आजवर दोन हाथ करत आली आहे. आणि आता तर ताफ्यात कमांड वेहायकल रूजू झाल्याने CRT टीमला शत्रूशी दोन हाथ करण्यास अजून पाठबळ मिळेल.

कमांड व्हीकलचा शत्रुसोबत लढताना पुरेपूर फायदा होतो. कारण ही गाडी पूर्णतः बुलेट प्रूफ आहे. आणि गाडीची किमया एवढ्यावर थांबत नाही तर ह्या गाडीत १६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. जे रात्री आजूबाजूची परिस्थिती हाताळण्याचे योग्य काम करतात. आजूबाजूच्या ३ किमी अंतावरील गोष्टीवर ह्या कॅमेऱ्याने नजर ठेवली जाते.

ह्या परिसरात थोडी तरी हलचाल जाणवली तरी हे कॅमेरे त्याची माहिती देतात. ह्या गाडीच्या टायरवर गोळी लागली तरी सुद्धा ६० किमी पर्यंतचे अंतर ही गाडी गाठू शकते. आणि ह्या गाडीत रडार यंत्रणा सुद्धा बसविण्यात आली आहे. ह्या गाडीमुळे शत्रूला सुद्धा धडकी भरते.

गाडीत मॉनिटर वरून सर्व आजूबाजूच्या गोष्टीवर नजर ठेवली जाऊ शकते. गाडीत चार ते पाच जवान राहू शकतात आणि संपूर्ण गाडी मध्ये वातानुकूलित यंत्रणा (Ac) बसविण्यात आली आहे. जेवणाची सुविधा आणि फर्स्ट एड किट सुद्धा ह्या गाडीत उपलब्ध असेल.

जम्मू काश्मीर पोलिसांच्या ताफ्यात ही गाडी आल्याने शत्रू सोबत दोन हात करण्यासाठी त्यांना अधिक सोपे जाईल. ह्यामुळे सध्या सर्वच स्तरावरून भारत सरकारचे कौतुक होत आहे. वेळोवेळी विज्ञानाच्या प्रगती नुसार आपण पुढे चालणे गरजेचे असते. Command Vehicle मुळे खूप मोठा फायदा होणार आहे हे मात्र खरं आहे.

तुम्हाला सुद्धा वाचून नक्कीच छान वाटलं असेल तर तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *