एक उत्तम अभिनेता अशी श्रेयस तळपदेची ओळख आहे. त्यांनी मराठीपासून हिंदी इंडस्ट्रीपर्यंत आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. आताही तब्बल सतरा वर्षानी तो आपल्याला मराठी मालिकेमधे पाहायला मिळणार आहे. झी मराठीवर येणारी नवीन मालिका माझी तुझी रेशीमगाठी यात त्याच्यासोबत प्रार्थना बहिरे ही असणारा आहे.
पण सध्या हा अभिनेता एक वेगळ्याच वळणावर येऊन ठेपला आहे. त्याच्यावर एक गुन्हा दाखल झाला आहे. तर या प्रकरणाची संपूर्ण बाजू अशी आहे की राहुल भंडारी यांचा अलबत्त्या खलबत्त्या या सेट विषयी हा एका नाटकाचा सेट आहे. बऱ्याच दिवसापासून सर्वच सेट बंद आहेत कारण लॉक डाऊन असल्यामुळे अलबत्त्या खलबत्त्या या नाटकाचा सेट हा सुध्दा बंद होता.
त्यामुळे हा सेट सुरेश सावंत यांच्या गोदामात ठेवला होता यांनी सेट त्यांनी श्रेयस तळपदे यांना कमर्शियल शूटिंग साठी म्हणून दिला. पण यापुढे जाऊन हा सेट भक्षक या ओटीटी प्रोजेक्टसाठी वापरला गेला आहे. राहुल भंडारी यांना ही बाब कळल्यानंतर त्यांनी याबाबत लगेच आक्षेप घेतला. हा सेट वापरण्यासाठी माझी परवानगी का नाही घेतली असा आरोप त्यांनी लावला आहे.
सुरेश सावंत यांनी मला कोणत्याही प्रकारची कल्पना न देता कमर्शियल प्रोजेक्टसाठी वापरायला दिला आहे. असा गुन्हा सिवडी येथील पोलिस स्टेशन मध्ये नोंदवला आहे. नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीर पणे एक सेट वापरणे हा कायदेशीर गुंन्हा आहे त्यामुळे त्यांनी यावर आक्षेप घेतला आहे.
आता याचा या नवीन येणाऱ्या “तुझी माझी रेशीमगाठ” मालिकेवर काही परिणाम होइल का? पण तरीही अभिनेता श्रेयस तळपदे याने सर्व आरोप फेटाळले आहेत. याशिवाय श्रेयस तळपदे मानहानीचा दावा करणार आहे.