बातमी

व्हॅलेन्टाईनडेने निमित्ताने सोशल मीडियावर फसवी पोस्ट शेअर होतेय, तुम्ही तर क्लीक केले नाही ना?

अलीकडे सायबर गुन्ह्यांचा वाढता होऊदोस पाहता यावर आला घालणे मोठ्या गरजेचे झाले आहे. सायबर गुन्हे रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक झाले आहे. वाढत्या गुन्हेगारीने लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे. याच निमित्ताने सोशल मीडियावर एक फसवी लिंक व्हायरल होते आहे.

व्हॅलेन्टाईन डे म्हणजे प्रेमाचा दिवस मात्र या वर्षी व्हॅलेंटाईन डे निमित्ताने एक पोस्ट सोशल मीडियावर फिरते आहे. ई-मेल अथवा फेसबुक, सोशल साईटद्वारा चॅटिंग वा सर्फिंगच्या माध्यमातून गुन्हेगार आपली संगणकीय ओळख (आय.डी.), पासवर्ड हॅक करतात. विशिष्ट व्हायरस आपल्या संगणकात डाऊनलोडसाठी पाठवून आपली संपूर्ण वैयक्तिक माहिती, संगणकावर केल्या जाणार्‍या सर्व क्रिया, बँक अकाऊंट नंबर, पासवर्ड चोरून नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड सोसावा लागल्याची अनेक उदाहरणे आहेत.

व्हॅलेन्टाईनडे निमित्ताने आलेल्या या लिंक वर कपल्स ना फ्री मध्ये राज हॉटेल ला राहण्याची संधी देण्यात येईल असे सांगितले आहे. प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आले आहे. स्मार्ट फोनमुळे जीवनमानात बदल झाले. परंतु, हेच स्मार्ट फोन आज सायबर गुन्हेगारीस प्रोत्साहन देत आहे. तरुणाई यांच्या विळख्यात अधिक अडकली आहे. सायबर गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालल्याने सरकारपुढेदेखील ते रोखाने आव्हानात्मक ठरत आहे.

मात्र सायबर आले गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून यासाठी विशेष परीपत्रकच जाहीर करण्यात आलं आहे. लोकांनी कुठल्याही मोहाला बळी पडू नये असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर दिसणारी ही लिंक फ्री मध्ये राहणे आणि काही स्पेशल ऑफर्स साठी असल्याचं मेसेज मध्ये सांगितलं जातंय. अनेक लोक याला बळी देखील पडत आहेत.इंटरनेट हे माहितीचे महाजाल आहे आणि निश्चितच ते समाजासाठी एक वरदानही आहे पण त्याचा वापर तेवढा आपण सजगतेने केला पाहिजे.

या गिफ्ट कार्ड मध्ये तुम्हाला चॉकलेट, जेवण, फ्री बक्षीस म्हनुन जेवण अस देण्यात येईल असं सांगितलं आहे. मात्र प्रत्यक्षात ही लिंक फसवी आहे. ताज हॉटेल व्यवस्थापनाने याबद्दल माहिती देत आपण कुठल्याही प्रकारची महिती दिली नसल्याचं सांगितले आहे.आजच्या युगात इंटरनेट मानवाचा अविभाज्य घटकच बनला आहे.इंटरनेटचा वापर करताना सावधगिरी बाळगली, तर सायबर गुन्हे टाळण्यास मोठी मदत मिळू शकते. सायबर गुन्हेगार नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हे करतात.

त्यात सामान्य नागरिक बळी पडून आर्थिक व सामाजिक नुकसान होते. तर या व्हॅलेंटाईन डे निमित्त दिलेल्या लिंक वर क्लीक केल्यास तुम्ही तुमची खासगी ईफॉर्मेशन गुन्हेगारांकडे सेव होईल. जसे की बँकेला लिंक असणारे, ईमेल, फोन नंबर, आणि आणि माहिती. सोबतच हा तुमच्या सिस्टीम मध्ये घुसणारा मालवेअर देखील हे जो छुप्या पद्धतीने आपल्या मोबाईल ला ऍकॅसेस करू शकतो. जो की आपली खासगी माहिती गोळा करून चोरट्याना देतो. फोटोंच्या बाबतीत देखील तसंच आहे.

फोटो शेअर करताना समाजमाध्यमवरील पर्यायांचा आधी विचार करावा. विश्वासार्हता असलेल्या लोकांशी ते शेअर करावेत. आपले फोटो सर्वासाठी उपलब्ध होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. खोट्या डोमेन नेम चा वापर करून ही वेबसाईट बनवली गेली आहे. अजून तरी फ्रॉड ची कुठलीही तक्रार आलेली नाही मात्र याबद्दल लोकांकडून मोठ्या प्रमाणात इन्कवायरी करण्यात येत आहे.

त्यामुळे आपली वैयक्तिक व गोपनीय माहिती कोणत्याही अनोळखी व्यक्ती अथवा वेबसाईटवर अपलोड करू नका. याबाबत देखील कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया चालू आहे. मात्र हा अमिशाला कोणीही बळी पडू नये असे देखील आवाहन केले जात आहे. महानगरीय शहरात सायबर गुन्हेगारीत अधिक प्रमाणात असल्याचे दिसून येते.

बाहेरील राज्यामधून येणार्‍यांकडून अधिकचे गुन्हे घडतात हेदेखील समोर आले आहे. त्यामुळे सध्या गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढते आहे. याबद्दल सायबर सेल पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे. कोणत्याही फसव्या जाहिरातींना क्लीक करून आपल्या गोपनीय माहिती कुठेही टाकू नये.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *