बातमी

जे. जे. ठाकूर शाळेने केले कौस्तुकापद काम, ३१८ विद्यार्थ्यांची संपूर्ण वर्षाची फी केली माफ

उरण तालुक्यातील आवरे गावातील जे. जे. ठाकूर या शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक जनार्दन ठाकुर यांनी १० वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांचे २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षाची संपूर्ण फी माफ केली आहे.

एकूण ३१८ विद्यार्थ्यांची फी संस्थेने माफ केली आहे, इतरही संस्थांनी या गोष्टीचा आदर्श घ्यायला हवा अशी सर्वत्र चर्चा सुरू आहे. आपल्या आजूबाजूला असणारी परिस्थिती तशीही चिंताजनक आहे, त्यामुळे अशा निर्णयाचे स्वागतच केले जाईल.

आवरे गावातील रयत शिक्षण संस्थेत  शहापूर येथे कार्यरत असणारे शिक्षक आणि जे. जे. ठाकूर शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक जनार्दन ठाकुर यांनी महामारीच्या काळात विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता हा निर्णय घेतला आहे.

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीही या गोष्टीची नोंद घेतली आहे, आणि इतरही शिक्षण संस्थांनी असे पाऊल उचलायला काहीच हरकत नाही, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

जे. जे. ठाकूर शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक जनार्दन ठाकुर हे आवरे गावातील शिवभक्त आहेत तसेच आवरे गावातील भोलेनाथावर त्यांची श्रद्धा आहे. मंदिराचे काम चालू असताना त्यांनी स्वखर्चातून ४२ हजारांची मदत केली.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *