हेल्थ

चिकन खा आणि व्हा मजबूत, बघा त्याचे फायदे आणि तोटे

आपल्या आहारात जसा भाजीपाला महत्वाचा आहे तसेच चिकन खाणे हे सुध्दा तितकेच महत्वाचे आहे. चिकन हे अनेक प्रकारे बनवले जाते प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जाते. पण त्याच्यातून मिळणारे गुणधर्म हे सर्वांनाच सारखे मिळतात. भारतात काय जगात अनेक ठिकाणी चिकन खानाऱ्यांची संख्या कमी नाही आहे. चिकन हे उच्च प्रतीची प्रथिन आणि चरबी कमी असणारा स्त्रोत आहे.

तसेच जीवनसत्त्व अ, ब, कॅल्शिअम, लोह, कोबाल्मीन, मॅग्नेशिअम आणि फोलेट हे महत्वपूर्ण घटक ही आपल्याला मिळत असतात. चिकनमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते त्यामुळे जी लोक जिम करतात त्यांना हे चिकन खाणे खूप महत्वाचे आहे याशिवाय जी लोकं डाएट करतात त्यांनाही चिकन खाण्याचा सल्ला दिला जातो. मांस पेशी यामुळे मजबूत होतात.

प्रोटीन शिवाय चिकनमध्ये कॅल्शिअम आणि फॉस्पोरसचे प्रमाण ही मुबलक असते. त्यामुळे तुमची हाड मजबूत होतात शिवाय दात ही मजबूत होतात. त्यामुळे नियमित चिकन खा आणि हाड मजबूत करा. चिकन खाल्ल्याने त्यात असणारे ट्रिप्टोफेन आणि विटामिन बी 5 हे घटक आपल्या शरीरावर कोणत्याही प्रकारे येणारा ताणतणाव कमी करण्यास मदत करतात.

चिकनमध्ये असे घटक असतात त्यामुळे तुम्हाला आवश्यक असणारी रोगप्रतिकार शक्ती मिळत असते. त्यामुळे तुमचे आजार होण्यापासून ही संरक्षण होते. चिकनमधे लोह भरपूर प्रमाणात असते त्यामुळे अनेमिया या रोगापासून तुम्ही दूर राहता. तसेच चिकन मध्ये असे घटक असतात त्यामुळे तुमचं रक्ताचाप आणि कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते.

चिकनमधे वियमिन सी आणि झिंक हे घटक असतात त्यामुळे तुमची दृष्टी मजबूत होते. तुम्हाला सर्दी झाली असेल तर चिकन चा सूप करून प्या त्यामुळे तुमच्या शरीरात गरमी निर्माण होते आणि सर्दी कमी होते.

चिकन चे काही दुष्परिणाम – अधिक चिकनचे सेवन ही करू नये त्यामुळे हृदय सारख्या आजारांचा सामना करावा लागतो. याशिवाय ज्यांना मधुमेह आहे त्यांनीं ही चिकन चे सेवन कमी करावे. स्किन सोबत चिकन खाल्ल्याने तुमची चरबी वाढू शकते.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *