अट्टल तळीरामांना मात्र ही बातमी ऐकल्यावर मोठा धक्काच बसला असेल, लॉकडावून मध्ये कसं तरी स्वताला सांभाळत दिवस काढले, तेव्हा परिस्थितीही अशी होती की कुठे काही मिळणे देखील अवघड होते. पण आता तसे नाही आपण काही निर्बंधांसहित बाहेर जाऊ शकतो त्यामुळे मद्यविक्री देखील चालू झाली मात्र आता नवीनच बाजारात आलेली बातमी तुम्ही ऐकली का..?? हो तुम्ही बरोबर ऐकले, कोरोनाची लस टोचल्यावर दोन महिने तुम्हाला जर मद्यपान करण्यावर बंदी असेल तर कसं होईल..?? हो असे होणार आहे याविषयी कायदेशीर पत्र ही निघणार आहे मात्र भारतात नाही तर रशियात, मात्र आपल्याकडे हा नियम नाही असा विचार करून सुटकेचा निश्वास सोडू नका.
कारण कदाचित भारतात देखील असा काही फतवा निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लसी ची आपणच नाही तर संपूर्ण जग वाट पाहत आहे मात्र करोनाच्या लसी संदर्भातील ही प्रतिक्षा लवकरच संपणार असल्याचे आशादायक चित्र सध्या तरी दिसत आहे. तरीही आजही काळजी घेणे तितक्याच गरजेचे आहे. लस तयार असून त्या लोकांना उपलब्ध करून देण्यासाठी लशींचा पुरेसा साठा उपलब्ध करून तो बाजरात आणण्याची कामं युद्धपातळीवर केली जात आहे. भारतात देखील आपल्या स्वदेशी लसीचे उत्पादन जोरात चालू असून या वर्षाच्या शेवटच्या महिन्या पर्यंत याचे लासीकरन सुरू होऊन कोरोना एक सामान्य आजार होईल असे सांगितले जात आहे. युनायटेड किंग्डम, रशिया आणि चीनसारख्या देशांनी आपआपल्या देशातील नागरिकांना करोनाची लस देण्यासंदर्भातील मोहिम सुरु केली आहे.
भारतात देखील अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सर्वात आधी लस देण्यात येणार आहे त्यासाठी पुरेसा लस साठा तयार केला जात आहे. येत्या डिसेंबर मध्ये अतिअवश्यक रूग्णांना लस दिली जाईल अशी माहिती सिराम इन्स्टिट्यूट चे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर्श पुनावाला यांनी दिली. हीच परिस्थिती बाकी देशामध्ये देखील आहे लस तर आता जनसामान्यांना मिळणार , मात्र ही लस घेतल्यानंतरी आयुष्य लगेच पूर्वीप्रमाणे होईल अशी अपेक्षा असेल तर तशी शक्यता सध्या तरी दिसत नाहीय. त्यामुळे आपल्याला आवश्यक ते नियम पुढील काही काळात पाळावेच लागतील, जसे की गर्दी टाळणे, मास्क लावणे, सॅनिटाइझर, आणि विशेष म्हणजे योग्य आहार आणि संसर्ग होण्यासाठी ज्या गोष्टी कारणीभूत ठरतात अशा गोष्टी टाळणे हे करून काही काळ तरी सावधान राहणे गरजेचे आहे.
कोविड-१९ ला प्रतिबंध करण्यात रशियाची स्पुटनिक व्ही लस देण्याआधीच रशियन आरोग्य अधिकाऱ्यांनी या लसीसंदर्भात नागरिकांना इशारा दिला आहे. मात्र हीच स्पुतिनिक लस घेतल्यावर चक्क दोन महिने मद्यपान करणे बंद असणार आहे. आणि या काळात जर तुम्ही तसे केलेच तर दिलेल्या लशींचा अपेक्षित परिणाम दिसणार नाही त्यामुळे लस न घेतल्या बरोबर होईल असेही तज्ञ लोकांकडून सांगण्यात येत आहे.. करोनाची लस दिल्यानंतर ती शरीरामध्ये सक्रीय होऊन परिणाम दाखवण्यास किमान ४२ दिवसांचा अवधी लागू शकतो असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे त्या कालावधीत लोकांना मद्यपान करण्यास बंदी असणार आहे, आरोग्याच्या दृष्टीने हा नियम ठरवण्यात आला असल्याने त्याचे पालन करणे ही नागरिकांची जबाबदारी बनली आहे.
रशियाने सर्वात आधी लशीची घोषणा केली होती मात्र अजूनही त्यांना प्रतिक्षाच करावी लागत आहे त्या तुलनेत भारताने आधी कुठल्याही प्रकारच्या घोषणा केल्या नाहीत मात्र आपले काम चालूच ठेवले त्याप्रमाणे परिणाम आता आपल्या समोर आहे लवकरच संपूर्ण भारतीय बनावटीची लस आपल्याला मिळणार असल्याने कोरोना काही काळातच हद्दपार होईल अशी आशा तज्ञांकडून व्यक्त होत आहे. मात्र रशियन सरकारने जसे मद्य प्राशन करण्यावर मज्जाव केला आहे तसेच आपल्या भारतात झाल्यावर मात्र तळीरामांना ही गोष्ट नक्कीच मोठ्या कष्टाने सहन करावी लागेल यात शंका नाही..!!